IND vs AUS : टीम इंडिया विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघ जाहीर

| Updated on: Jan 12, 2023 | 1:59 AM

टीम इंडिया विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी (Border Gavsakar Trophy) ऑस्ट्रेलियाने 18 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे.

IND vs AUS : टीम इंडिया विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघ जाहीर
Follow us on

कॅनबेरा : टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) यांच्यात एकदिवसीय मालिका सुरु आहे. या मालिकेनंतर न्यूझीलंड भारत दौऱ्यावर येणार आहे. न्यूझीलंड या भारत दौऱ्यात टीम इंडिया विरुद्ध प्रत्येकी 3 सामन्यांची एकदिवसीय आणि टी 20 मालिका खेळणार आहे. न्यूझीलंडच्या भारत दौऱ्यानंतर ऑस्ट्रेलिया भारत दौऱ्यावर (Australia Tour Of India 2023) येणार आहे. ऑस्ट्रेलिया या टूरमध्ये टेस्ट आणि वनडे सीरिज खेळणार आहे. या दौऱ्यातील कसोटी मालिकेसाठी (Border Gavsakar Trophy) ऑस्ट्रेलियाने 18 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. (ind vs aus australia announced 18 player squad for 4 match test series against team india 2023 pat cummins will lead team)

ऑस्ट्रेलिया टीम इंडिया विरुद्द या कसोटी मालिकेत फिरकी गोलंदाजांच्या भरोशावर भिडणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या 18 सदस्यीय टीममध्ये 4 फिरकी आणि 6 वेगवान गोलंदाजांचा समावेश आहे. फिरकी गोलंदाजांपैकी टीम इंडियासाठी सर्वात मोठी डोकेदुखी म्हणजे ऑफ स्पिनर नॅथन लियॉन.

हे सुद्धा वाचा

नॅथन कॅप्टन रोहित शर्मा आणि विराट कोहलीसाठी डोकेदुखीपेक्षा कमी नाही. नॅथनचा टीम इंडिया विरुद्ध कसोटीमध्ये चांगला रेकॉर्ड आहे. नॅथन भारतीय खेळपट्ट्यांवर घातक सिद्ध होऊ शकतो.

WTC फायनलच्या दृष्टीने निर्णायक मालिका

टीम इंडियासाठी जागतिक क्रिकेट अजिंक्यपदच्या (World Test Championship) दृष्टीने हे मालिका महत्त्वाची असणार आहे. टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात धडक द्यायची असेल तर ऑस्ट्रेलिया विरुद्ध 3-1 अशा फरकाने मालिका जिंकावी लागेल.

कसोटी मालिकेचं वेळापत्रक

पहिली कसोटी, 9-13 फेब्रुवारी, नागपूर

दुसरी कसोटी, 17-21 फेब्रुवारी, दिल्ली

तिसरी कसोटी, 1-5 मार्च, धर्मशाळा

चौथी कसोटी, 9-13 मार्च, अहमदाबाद

टीम इंडिया विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया

पॅट कमिन्स (कर्णधार), डेविड वॉर्नर, एश्टोन एगर, स्कॉट बोलँड, एलेक्स कॅरी, कॅमरन ग्रीन, जोश हेझलवुड, पीटर हॅंडस्कॉम्ब, ट्रेविस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नॅथन लियॉन, लांस मॉरिस, टॉड मरफी, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव स्मिथ, मिशेल स्टार्क आणि मिशेल स्वीपसन.