VIDEO: भर मैदानात Dinesh Karthik ला मुलीने टच केलं आणि मग…

Dinesh Karthik: कधी घडलं ? मैदानात काय झालं ते VIDEO मध्ये पहा

VIDEO: भर मैदानात Dinesh Karthik ला मुलीने टच केलं आणि मग...
Dinesh Karthik
Image Credit source: twitter
| Updated on: Sep 27, 2022 | 11:39 AM

मुंबई: दिनेश कार्तिक तसा कूल खेळाडू आहे. पण ऑस्ट्रेलिया विरुद्ध T20 सीरीज जिंकल्यानंतर तो आपल्या रागावर नियंत्रण ठेवू शकला नाही. दिनेश कार्तिक रागावल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. यात दिनेश कार्तिक वैतागल्याच स्पष्ट दिसतय. दिनेश कार्तिक एका मुलीवर भडकल्याचं या व्हिडिओमध्ये दिसून येतय. पण नेमकं घडलं काय? तसा कुल असणारा कार्तिक इतका का संतापला?.

दिनेश कार्तिकच हे रुप पाहून क्रिकेट फ्रॅन्सनाही आश्चर्याचा धक्का बसला. कारण दिनेश कार्तिक आतापर्यंत मॅच फिनिश करताना किंवा ड्रेसिंग रुमची शोभा वाढवताना दिसला आहे.

कितीच्या स्ट्राइक रेटने धावा केल्या?

हैदराबादमध्ये टी 20 सीरीजचा शेवटचा सामना खेळला गेला. या मॅचमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध दिनेश कार्तिक 1 रन्सवर नाबाद राहिला. या संपूर्ण सीरीजमध्ये दिनेश कार्तिकने 212.50 च्या स्ट्राइक रेटने धावा बनवल्या.

ते दिनेश कार्तिकला आवडलं नाही

मैदानात खोऱ्याने धावा करणाऱ्या दिनेश कार्तिकला इतका राग का आला? ते जाणून घ्या. दिनेश कार्तिकच्या संतापण्यामागे कारण आहे, एक मुलगी. या मुलीने दिनेश कार्तिकला टच केला. ते दिनेश कार्तिकला आवडलं नाही. आता कदाचित अजाणतेपणी या मुलीकडून दिनेश कार्तिकला स्पर्श झाला असेल. पण दिनेश कार्तिकला त्या कृतीचा राग आला.

त्या मुलीला तिची चूक मान्य

व्हायरल व्हिडिओमध्ये दिनेश कार्तिक त्या मुलीवर रागावल्याच स्पष्टपणे दिसतय. या दरम्यान त्या मुलीने आपली चूक सुद्धा मान्य केली. पण कार्तिकचा पारा हाय होता.

ही मुलगी सपोर्ट स्टाफचा भाग का?

दिनेश कार्तिकला ज्या मुलीवर भडकला, ती बीसीसीआय आणि टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफशी संबंधित असल्याची माहिती आहे. मैदानावर असलेल्या या मुलीने टीम इंडियाची जर्सी परिधान केली होती. त्यामुळे ही मुलगी सपोर्ट स्टाफशी संबंधित असण्याची शक्यता आहे.