
अहमदाबाद : टीम इंडिया आज वनडे वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये खेळतेय. याच श्रेय मोठ्या प्रमाणात भारतीय गोलंदाजांना जातं. त्यांनी अप्रतिम कामगिरी केलीय. भारतीय गोलंदाजांनी काही सामन्यात इतकी जबरदस्त गोलंदाजी केली की, समोरच्या संघाला 100 धावांच्या आत ऑलआऊट केलं. यात जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीच मोठ योगदान आहे. दोघांनी चालू वर्ल्ड कपमध्ये भारताकडून एक रेकॉर्ड केलाय. एकाच वर्ल्ड कपमध्ये 20 विकेट घेणारी ही पहिली भारतीय गोलंदाजांची जोडी ठरली आहे. वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये बुमराह-शमीने 20 पेक्षा जास्त विकेट घेतल्या आहेत.
मोहम्मद शमीला चौथ्या सामन्यात संधी मिळाली. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिलं नाही. घातक बॉलिंग केली. सेमीफायनलला शमी फायनल म्हटलं गेलं. त्याने एकट्य़ाने 7 विकेट काढल्या. चार सामन्यात त्याने पाच विकेटचा रेकॉर्ड केला. भारताकडून तो सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. 7 सामन्यात त्याने 23 विकेट काढले. यात न्यूझीलंड विरुद्ध 57/7 ही त्याची कामगिरी आहे. जसप्रीत बुमराहने 11 सामन्यात 20 विकेट घेतल्या. यात 39/4 ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती.
गोलंदाजांनी हा वर्ल्ड कप गाजवला
टीम इंडियाच्या गोलंदाजांनी हा वर्ल्ड कप गाजवला. त्यामुळेच प्रतिस्पर्धी टीमच फारस काही चाललं नाही. पहिली फलंदाजी असो किंवा नंतर गोलंदाजी टीम इंडियाच्या प्लेयर्सनी सगळ्याच परिस्थितीत उजवा खेळ दाखवला. आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर वनडे वर्ल्ड कपचा फायनल सामना सुरु आहे. टीम इंडियाने 50 ओव्हर्समध्ये 240 धावा करुन ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 241 धावांच लक्ष्य ठेवलं आहे.