IND VS BAN 2ND TEST: बांगलादेशचा मोमिनूल हक टीम इंडियावर पडला भारी, कानपूरमध्ये ठोकलं शतक

भारत आणि बांग्लादेश यांच्यात दुसरा कसोटी सामना कानपूरच्या ग्रीनपार्क मैदानात सुरु आहे. या सामन्याचा चौथा दिवस असून ड्रॉच्या दिशेने कूच सुरु झाली आहे. पहिल्या डावात बांगलादेशला कमी धावांवर रोखणंही टीम इंडियाला कठीण झालं आहे. एकटा मोनिमुल हक टीम इंडियावर भारी पडला आहे.

IND VS BAN 2ND TEST: बांगलादेशचा मोमिनूल हक टीम इंडियावर पडला भारी, कानपूरमध्ये ठोकलं शतक
Image Credit source: Twitter
| Updated on: Sep 30, 2024 | 12:11 PM

भारत आणि बांग्लादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटीचा चौथा दिवस सुरु आहे. दोन दिवसांचा खेळ पावसामुळे वाया गेला. त्यामुळे चौथ्या दिवशी भारतीय संघ बांगलादेशला झटपट गुंडाळेल आणि सामन्यावर पकड मिळवेल अशी आशा होती. पण चौथ्या दिवशी मोनिमुल हकने भारतीय गोलंदाजांना चांगलंच झुंजवलं. शतकी खेळी करत बांगलादेशला 200 पार धावा घेऊन जाण्यास मदत केली. त्यामुळे या बांगलादेशचं आव्हान मोडून दुसरं आव्हान सेट करणं भारतीय संघाला अडचणीचं ठरणार आहे. त्यामुळे हा सामना ड्रॉच्या दिशेने झुकल्याचं क्रीडाप्रेमींचं म्हणणं आहे. दरम्यान मोमिनुलने 174 चेंडूत 16 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 100 धावा केल्या. मोमिनुल भारतात शतक ठोकणारा दुसरा बांगलादेशी खेळाडू आहे. तसेच त्याच्या कसोटी कारकिर्दितलं हे 13 वं शतक आहे. यासह बांगलादेशकडून सर्वाधिक कसोटी शतक झलकावणारा फलंदाज ठरला आहे. लंच ब्रेकपर्यंत बांगलादेशच्या 6 गडी बाद 205 धावा झाल्या होत्या. तर मेहदी हसन मिराज नाबाद 6 आणि मोमिनूल हक नाबाद 102 धावांवर खेळत होते. त्यामुळे पुढचे चार विकेट झटपट बाद करून दिलेलं आव्हान पूर्ण करायचं आहे. जर तसं झालं तरंच सामन्याचा निकाल लागू शकतो. पण तसं होईल असं वाटत नाही. टी20 क्रिकेटच्या गतीने खेळताना विकेटचं भानही ठेवावं लागणार आहे.

बांगलादेशचा पहिला डाव 35 षटकांनंतर सुरू झाला आहे. पावसामुळे दोन दिवसांचा खेळ वाहून गेल्यानंतर आता चौथ्या आणि पाचव्या दिवशी 98 षटकांचा खेळ होणार आहे. म्हणजे दिवसाचे सत्रही वाढवले ​​जाणार आहे. पहिले सत्र 11:45 वाजता संपेल. दुसऱ्या सत्र दुपारी 12.30 ते 2.30 पर्यंत असेल. तिसरे सत्र दुपारी 3 ते 5 वाजेपर्यंत चालेल. चौथ्या दिवशी पहिल्या सत्रात 31 षटके टाकण्यात आली, यात 98 धावा झाल्या आणि 3 विकेट पडल्या. भारताकडून आर अश्विनने 2, आकाश दीपने 2, मोहम्मद सिराजने 1 आणि जसप्रीत बुमराहने 1 गडी बाद केला आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

बांगलादेश (प्लेइंग इलेव्हन): शादमान इस्लाम, झाकीर हसन, नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शाकिब अल हसन, लिटन दास (विकेटकीपर), मेहदी हसन मिराझ, तैजुल इस्लाम, हसन महमूद, खालेद अहमद.

भारत (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएल राहुल, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज