
कोलंबो | आशिया कप 2023 सुपर 4 साखळी फेरीतील सहावा आणि शेवटचा सामना हा टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश यांच्यात खेळवण्यात येणार आहे. टीम इंडिया आधीच आशिया कप 2023 फायनलमध्ये पोहचली आहे. तर बांगलादेशचं आशिया कपमधून पॅकअप झालं आहे. त्यामुळे हा सामना निर्णायक नाही. मात्र बांगलादेश आशिया कप 2023 ची सांगता विजयाने करण्याच्या प्रयत्नाने मैदानात उतरणार आहे. बांगलादेश कधीही उलटफेर करु शकते. त्यामुळे टीम इंडियाला बांगलादेशला गृहीत धरुन अजिबात चालणार नाही. हा सामना टीव्ही आणि मोबाईलवर फुकट कसा पाहता येईल हे जाणून घेऊयात.
टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश यांच्यातील सामना हा शुक्रवार 15 सप्टेंबर रोजी खेळवण्यात येणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश सामना कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये पार पडणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरुवात होणार आहे. तर 2 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.
टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश सामना टीव्हीवर फ्री मध्ये डीडी स्पोर्ट्सवर पाहायला मिळेल.
टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश सामना मोबाईलवर फ्रीमध्ये पाहण्यासाठी हॉटस्टार एप डाऊनलोड करावा लागेल. हॉटस्टारवर मॅच फुकट पाहायला मिळेल.
आशिया कप 2023 साठी बांगलादेश टीम | शाकिब अल हसन (कॅप्टन), लिटॉन दास, तंजीद हसन तमीम, नजमुल हुसैन शांतो, तॉहिद हृदॉय, मुशफीकुर रहीम, मेहंदी हसन मिराज, तस्कीन अहमद, मुस्तफिजुर रहमान, हसन महमूद, महेदी हसन, नसुम अहमद, शमीम हुसेन, अफीफ हुसेन, शरीफुल इस्लाम, एबादत हुसेन आणि मोहम्मद नईम.
आशिया कपसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), शुभमन गिल, विराट कोहली, के.एल.राहुल, श्रेयस अय्यर, जसप्रीत बुमराह, ईशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, शार्दुल ठाकुर, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, सूर्यकुमार यादव, प्रसिद्ध कृष्णा, तिलक वर्मा.