IND vs BAN: टीम इंडिया बांग्लादेशसमोर सरेंडर, ‘या’ गोलंदाजासमोर काहीच चाललं नाही

IND vs BAN: 52 चेंडू बाकी असताना, टीम इंडियाचा डाव संपुष्टात आला.

IND vs BAN: टीम इंडिया बांग्लादेशसमोर सरेंडर, या गोलंदाजासमोर काहीच चाललं नाही
ind vs ban
Image Credit source: twitter
| Updated on: Dec 04, 2022 | 3:02 PM

ढाका: टीम इंडियाने आज बांग्लादेशसमोर पहिल्या वनडेमध्ये सरेंडर केलं. 52 चेंडू बाकी असताना टीम इंडियाचा डाव संपुष्टात आला. पहिल्या वनडेमध्ये टीम इंडियाकडून कोणी अशा कामगिरीची अजिबात अपेक्षा केली नव्हती. कॅप्टन रोहित शर्मा, विराट कोहली सारखे खेळाडू टीममध्ये असताना, मोठी धावसंख्या उभारली जाईल अशी अपेक्षा होती. पण बांग्लादेशी गोलंदाजांसमोर टीम इंडियाच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. फक्त केएल राहुल एकटा लढला.

त्याच्यासमोर काहीच चाललं नाही

बांग्लादेशचा डावखुरा फिरकी गोलंदाज शाकीब अल हसनने कमाल केली. त्याने 8 ओव्हर्समध्ये इतिहास रचला. त्याच्या गोलंदाजीसमोर रोहित शर्मा, विराट कोहलीच काहीच चाललं नाही. त्याने भारताचा निम्मा संघ गारद केला. त्याने 5 विकेट घेतल्या.

भारताविरुद्ध अशी कामगिरी करणारा दुसरा बॉलर

भारताविरुद्ध अशी कामगिरी करणारा शाकीब बांग्लादेशचा पहिला स्पिनर ठरला आहे. इंग्लंडच्या एश्ले जाइल्सनंतर वनडे क्रिकेटमध्ये भारताच्या 5 विकेट काढणारा दुसरा लेफ्ट आर्म स्पिनर आहे. पहिल्या वनडेत रोहित, विराट, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर आणि दीपक चाहरची विकेट त्याने काढली.

त्याने झटपट विकेट काढल्या

शाकीबने 10 ओव्हर्समध्ये 36 धावा देऊन 5 विकेट काढल्या. इबादतने 8.2 ओव्हर्समध्ये 47 धावा देऊन 4 विकेट काढल्या. शाकीबने आज लागोपाठ विकेट काढल्या. आधी त्याने रोहित, विराटला झटपट बाद केलं व धावगतीला लगाम घातला. त्यानंतर त्याने वॉशिंग्टन सुंदर, दीपक चाहर आणि शार्दुल ठाकूरला झटपट बाद केलं. त्या धक्क्यातून टीम इंडिया शेवटपर्यंत सावरली नाही.


बांग्लादेशला विजयासाठी इतक्या धावांचे लक्ष्य

फक्त केएल राहुल विकेट पडत असताना एकाबाजूने पाय रोवून उभा होता. त्याने 70 चेंडूत 73 धावा केल्या. यात 5 चौकार आणि 4 षटकार आहेत. टीम इंडियाचा डाव 186 धावांवर संपुष्टात आला. बांग्लादेशला विजयासाठी 187 धावांचे लक्ष्य दिले आहे.