
टीम इंडिया सप्टेंबर महिन्यात बांगलादेश विरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. उभयसंघात होणारी कसोटी मालिका ही एकूण 2 सामन्यांची असणार आहे. टीम इंडिया सध्या विश्रांतीवर आहे. तर दुसऱ्या बाजूला बांगलादेश पाकिस्तान विरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. त्यामुळे बांगलादेशचा टीम इंडिया विरूद्धच्या कसोटी मालिकेचाही सराव होत आहे. बांगलादेश पाकिस्तान दौऱ्यानंतर या कसोटी मालिकेसाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. अशात टीम इंडियाही अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर मैदानात उतरण्यासाठी सज्ज आहे. अशात टीम इंडियाचा एक विकेटकीपर फलंदाज 20 महिन्यांनी कसोटी संघात पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे.
टीम इंडियाचा विकेटकीपर बॅट्समन ऋषभ पंत 20 महिन्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये कमबॅक करण्यासाठी उत्सूक आहे. पंतने त्याचा अखेरचा कसोटी सामनाही बांगलादेश विरुद्धच खेळला होता. त्यानंतर पंतचा अपघात झाला होता. त्यानंतर पंतला अनेक महिने विश्रांती घ्यावी लागली. पंतने त्यानंतर आयपीएल, टी 20i आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं. त्यानंतर आता पंतचं लक्ष कसोटी मालिकेकडे लागून आहे.
पंतच्या कमबॅकमुळे कॅप्टन रोहित शर्मा याला विकेटकीपर म्हणून आणखी एक पर्याय मिळेल. तसेच पाचव्या स्थानी बॅटिंग कोण करणार ही रोहितची डोकेदुखी कायमची दूर होईल. पंत स्पिनरवर वरचढ होऊन खेळतो. अशात पंतचं स्पिनर्सवर दबाव तयार करण्यात महत्त्वाचं योगदान असणार आहे, ज्याचा सहकारी फलंदाजांना फायदा होईल. त्यामुळे पंतचं कमबॅक हे भारतासाठी अनेक आघाड्यांवर फायदेशीर ठरणार आहे. पंतने कसोटी कारकीर्दीतील 33 सामन्यांमध्ये 43.67 च्या सरासरीने 2 हजार 271 धावा केल्या आहेत. पंतने या दरम्यान 5 शतकं आणि 11 अर्धशतकं केली आहेत.
पहिला सामना, 19 ते 23 सप्टेंबर, चेन्नई
दुसरा सामना, 27 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर, कानपूर
बांगलादेश विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी संभावित टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएल राहुल, सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, आकाश दीप, मुकेश कुमार आणि मोहम्मद सिराज.