IND vs ENG 1st ODI: रोहित शर्माने टॉस जिंकला, अशी आहे टीम इंडियाची Playing 11

IND vs ENG 1st ODI: भारत आणि इंग्लंडमध्ये (IND vs ENG) आजपासून एकदिवसीय सामन्यांची मालिका (ODI Series) सुरु होत आहे. आज ओव्हलच्या मैदानावर पहिला वनडे सामना होत आहे.

IND vs ENG 1st ODI: रोहित शर्माने टॉस जिंकला, अशी आहे टीम इंडियाची Playing 11
IND VS ENG
Image Credit source: bcci twitter
| Updated on: Jul 12, 2022 | 5:32 PM

IND vs ENG 1st ODI: भारत आणि इंग्लंडमध्ये (IND vs ENG) आजपासून एकदिवसीय सामन्यांची मालिका (ODI Series) सुरु होत आहे. आज ओव्हलच्या मैदानावर पहिला वनडे सामना होत आहे. टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. टी 20 सीरीज मधील विजयाने टीम इंडियाचा आत्मविश्वास उंचावला आहे. दुसऱ्याबाजूला यजमान इंग्लंडचा संघ टी 20 सीरीज (T 20 Series) मधील पराभवाचा हिशोब चुकता करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. इंग्लंड यावेळी मजबूत संघ मैदानात उतरवणार आहे. त्यामुळे पहिल्या वनडे मध्ये विजय मिळवणं, टीम इंडियासाठी टी 20 इतकं सोपं नसेल. इंग्लंडचे अनेक सीनियर खेळाडू मैदानावर उतरतील. यात जॉनी बेयरस्टो, ज्यो रुट आणि बेन स्टोक्स यांचा समावेश आहे. जोस बटलर, लियाम लिव्हिंगस्टोनही या टीम मध्ये आहेत.

विराट कोहली बाहेर

विराट कोहली आजच्या सामन्यात खेळत नाहीय. ग्रोइनच्या दुखापतीमुळे तो खेळणार नाही, अशी कालच कल्पना देण्यात आली होती. शार्दुल ठाकूर आणि प्रसिद्ध कृ्ष्णा मध्ये संघाने कृष्णाला संधी दिलीय. शार्दुल ठाकूर एजबॅस्टन कसोटीत विशेष प्रभाव पाडू शकला नव्हता.

सूर्यकुमारकडून अपेक्षा

सूर्यकुमार यादवकडून भरपूर अपेक्षा असतील. शेवटच्या तिसऱ्या टी 20 सामन्यात सूर्यकुमार यादव कमालीचा खेळला. त्याने 55 चेंडूत 117 धावा फटकावल्या. त्याच्यामुळे भारतीय संघाच्या विजयाच्या आशा निर्माण झाल्या होत्या.

अशी आहे दोन्ही टीम्सची प्लेइंग 11

भारतीय संघ – रोहित शर्मा (कॅप्टन), शिखर धवन, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, रवींद्र जाडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, प्रसिद्ध कृष्णा, युजवेंद्र चहल

इंग्लंड संघ – जोस बटलर (कॅप्टन), जेसन रॉय, जॉनी बेयरस्टो, ज्यो रुट, बेन स्टोक्स, लियाम लिव्हिंगस्टोन, मोइन अली, क्रेग ओवर्टन, सॅम करण, डेविड विली, ब्रायडन कार्स, रीस टॉप्ली