
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांची टी 20i मालिका खेळवण्यात येत आहे. टीम इंडियाने या मालिकेतील पहिले दोन्ही सामने जिंकून 2-0 अशी एकतर्फी आघाडी घेतली आहे. उभयसंघातील तिसरा टी 20i सामना हा राजकोटमध्ये होणार आहे. बीसीसीआयने या तिसऱ्या सामन्याआधी सोशल मीडियावर एक व्हीडिओ पोस्ट केला आहे. या व्हीडिओतून उपकर्णधार अक्षर पटेल याने मोठी घोषणा केली आहे. अक्षर पटेलला नवी भूमिका मिळाली असल्याचं त्याने स्वत: जाहीर केलं आहे. अक्षरला नक्की कोणती नवी भूमिका मिळाली आहे? हे जाणून घेऊयात.
बीसीसीआयने काही दिवसांपूर्वी इंग्लंडविरुद्धच्या टी 20i मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. अपेक्षेप्रमाणे सूर्यकुमार यादव कर्णधार होता. मात्र निवड समितीने अक्षर पटेल याला उपकर्णधारपदाची जबाबदारी दिली. संघात हार्दिक पंड्या आणि इतर अनुभवी खेळाडू असूनही अक्षरला ही जबाबदारी दिल्याने आश्चर्य व्यक्त केलं गेलं नसतं तरच नवल. त्यानंतर आता अक्षरला कोणती नवी भूमिका मिळाली? हे समजून घेऊयात.
बीसीसीआय एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन एक व्हीडिओ पोस्ट केला आहे. अक्षर पटेल या व्हीडिओतून क्रिकेट चाहत्यांशी संवाद साधत आहे. बीसीसीआयने अक्षरला व्लॉगिंगची जबाबदारी सोपवली आहे. अक्षर या व्हीडिओत गूड मॉर्निंग, तुम्हारे भाई को आज कुछ हटकर मौका मिला आहे, कुछ नया रोल मिला है. मुझे ब्लॉगिंग करने का मौका मिला है. आज बापू ब्लॉग करेंगे”, असं अक्षर या व्हीडिओत बोलताना दिसतोय. या व्लॉगमध्ये संजू सॅमसन, अभिषेक शर्मा आणि टीम इंडियातील इतर सहकारी दिसत आहेत.
व्लॉगर अक्षर पटेल
𝙏𝙚𝙖𝙢 𝙑𝙡𝙤𝙜 🎬
Chennai ✈️ Rajkot
Presenting Axar Patel in a never seen before Avatar 😎
The #TeamIndia vice-captain goes behind the cam 🎥#INDvENG | @IDFCFIRSTBank | @akshar2026 pic.twitter.com/RuTGW8ChYN
— BCCI (@BCCI) January 27, 2025
इंग्लंड विरुद्ध टी 20i मालिकेसाठी सुधारित भारतीय संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अक्षर पटेल (उपकर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, टिळक वर्मा, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, वॉशिंग्टन सुंदर, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), शिवम दुबे आणि रमणदीप सिंग.
टी 20 सीरिजसाठी इंग्लंड टीम : जोस बटलर (कर्णधार) रेहान अहमद, जोफ्रा आर्चर, गुस ऍटकिन्सन, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, जेमी स्मिथ, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, साकिब महमूद, फिल सॉल्ट आणि मार्क वुड.