AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वसुधैव कुटुंबकम हे भारताच्या संस्कृतीविषयक ज्ञानाचे प्रतिबिंब – प्रो. मझहर आसिफ

"वसुधैव कुटुंबकम - सभ्यता संवाद" या विषयावर आधारित एका परिषदेचे आयोजन सेंटर फॉर स्टडीज इन इंटरनॅशनल रिलेशन्सने ( CSIR ) जामिया मिलिया इस्लामिया, नवी दिल्ली आणि MACAI, कोलकाता यांच्या सहकार्याने केले होते.

वसुधैव कुटुंबकम हे भारताच्या संस्कृतीविषयक ज्ञानाचे प्रतिबिंब - प्रो. मझहर आसिफ
वसुधैव कुटुंबकम: सभ्यता संवाद' परिषदेला विद्वानांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
| Updated on: Dec 16, 2025 | 10:01 PM
Share

“वसुधैव कुटुंबकम – सभ्यता संवाद” या विषयावर आधारित एका परिषदेचे आयोजन सेंटर फॉर स्टडीज इन इंटरनॅशनल रिलेशन्सने ( CSIR ) जामिया मिलिया इस्लामिया, नवी दिल्ली आणि MACAI, कोलकाता यांच्या सहकार्याने केले होते. मंगळवार, १६ डिसेंबर २०२५ ( पहिला दिवस  ) रोजी झालेल्या या कार्यक्रमात एक उद्घाटन सत्र आणि तीन पूर्ण सत्रे झाली.

एआय आणि आयसीटीद्वारे तांत्रिक संपर्क असूनही, मानवतेला अजूनही हिंसाचार, संघर्ष आणि पर्यावरणीय संकटांचा सामना करावा लागत आहे असे आरएसएसचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी आपले विचार मांडताना सांगितले. त्यांनी भारताच्या चिरस्थायी सभ्यतावादी जाणीवेवर भर दिला, जिने आधुनिक तंत्रज्ञानावर अवलंबून न राहता हजारो वर्षांपासून एकता, शांती आणि सहअस्तित्व जोपासले आहे. त्यांनी आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये मूल्ये, संवेदनशीलता आणि सांस्कृतिक जाणीवेने प्रेरित होऊन सत्तेचा नैतिक वापर करण्याची गरज विशद केली.

वसुधैव कुटुंबकम हा केवळ तात्विक आदर्श नाही, तर समकालीन जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी एक व्यावहारिक चौकट आहे असे आपल्या उद्घाटीय भाषणात बिहारच्या नालंदा विद्यापीठचे कुलगुरु प्रा.सचिन चतुर्वेदी यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की संकीर्ण आर्थिक निकषांच्या पलीकडे जाऊन शाश्वत वापर आणि उत्पादन, मजबूत पायाभूत सुविधा आणि मानवी कल्याणाचे व्यापक निर्देशक स्वीकारण्याची गरज असल्याचे ते यावेळी म्हणाले.

भारताच्या संस्कृतीविषयक ज्ञानाचे प्रतिबिंब

वसुधैव कुटुंबकम हे भारताच्या संस्कृतीविषयक ज्ञानाचे प्रतिबिंब आहे, जे ज्ञान, अध्यात्म आणि सर्वसमावेशकतेमध्ये रुजलेले आहे असे उद्घाटनपर सत्रात विशेष अतिथी म्हणून भाषण करताना जामिया मिल्लिया इस्लामियाचे कुलगुरू  प्रो. मझहर आसिफ यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की भारतीय संस्कृती ज्ञानावर आधारित आहे, जी कठोर श्रद्धा प्रणालींऐवजी कुतूहल, संवाद आणि सहअस्तित्वाला प्रोत्साहन देते.

सांस्कृतिक एकात्मता, आंतरराष्ट्रीय सुरक्षा आणि शांतता या भारतीय संकल्पनांवर केंद्रित असलेल्या पूर्ण सत्रांमध्ये भारत आणि परदेशातील विद्वानांनी भाग घेतला. “सांस्कृतिक भारत” (ग्रेटर इंडिया) ही संकल्पना भौगोलिक सीमा ओलांडते आणि त्याच्या अंतर्निहित बहुलतेवर आणि ऐतिहासिकदृष्ट्या दडपलेल्या सांस्कृतिक मूल्यांना पुनरुज्जीवित करण्याचे महत्त्व यावर चर्चासत्रांनी भर दिला.

आंतरराष्ट्रीय सुरक्षेवरील चर्चेत राज्यांच्या धोरणात्मक गणिते, प्रशासनातील कमतरता, दहशतवाद आणि हवामान संकट यासारख्या घटकांचा विचार करण्यात आला, ज्यामुळे जागतिक शांततेच्या नाजूकतेला वाढते.या चर्चांनी सर्व सहभागींना सखोल अंतर्दृष्टी प्रदान केली आणि व्यापक चिंतनासाठी भरपूर साहित्य प्रदान केले.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.