गरोदर महिलांना जर लोहाची कमतरता जाणवत असल्यास ‘या’ बिया ठरू शकतात खूप फायदेशीर
लोह हे सर्वात महत्वाचे पोषक घटकांपैकी एक आहे. खास करून गरोदर महिलांना लोहच्या कमतरतेमुळे मोठ्या समस्या उद्भवू शकतात. चला तर मग आजच्या लेखात आपण गरोदरपणात लोहाची कमतरता जाणवल्यास कोणत्या बियांचा आहारात समावेश करणे उपयुक्त ठरेल ते जाणून घेऊयात.

लोह हा आपल्या सर्वांच्या शरीरासाठी एक महत्त्वाचा घटक आहे. जर तुम्ही गरोदर माता असाल तर लोहाची कमतरता भासू नये यासाठी लोहयुक्त पदार्थांचे सेवन करणे गरजेचं आहे. कारण लोह बाळाच्या विकासासाठी आणि गर्भधारणेदरम्यान आईला अशक्तपणापासून वाचवण्यासाठी ते अत्यंत महत्त्वाचे आहे. गरोदरपणात महिलेला जितके जास्त पोषक घटक आहारातून मिळतील तितके बाळाला जास्त पोषण मिळेल, म्हणून गरोदर महिलांना शरीरासाठी लोह अत्यंत महत्त्वाचे आहे. गर्भधारणेदरम्यान लोहाच्या पातळीत घट झाल्याने लक्षणीय अशक्तपणा आणि इतर समस्या उद्भवू शकतात.
लोहाच्या कमतरतेमुळे मुलाच्या विकासात समस्या निर्माण होऊ शकतात
याव्यतिरिक्त गरोदर महिलेच्या शरीरात लोहाच्या कमतरतेमुळे गर्भाच्या विकासात समस्या निर्माण होऊ शकतात. ज्यामुळे बाळाच्या जन्मानंतरही बाळाला मोठ्या अडचणी येऊ शकतात. जर प्रसूतीच्या वेळी आईमध्ये लोहाची कमतरता असेल तर बाळाचा जन्म अकाली किंवा कमी वजनाचा होऊ शकतो. शिवाय मेंदूच्या विकासासारख्या समस्या देखील उद्भवू शकतात. प्रसूतीदरम्यान महिलांना जास्त रक्तस्त्राव होण्याचा धोका असतो. त्यामुळे आजच्या लेखात आपण या काही बियाण्यांबद्दल जाणून घेणार आहोत जे गरोदर महिलांनी सेवन केल्यास गर्भअवस्थेत पोषक तत्वांची कमतरता टाळण्यास मदत होईल.
भोपळ्याच्या बिया
भोपळ्याच्या बिया पोषक तत्वांचा समृद्ध स्रोत आहेत. ते केवळ लोहाच्या कमतरतेवरच नव्हे तर मॅग्नेशियम आणि प्रथिनांच्या कमतरतेवर देखील मदत करतात. गरोदर महिलांनी त्यांच्या तिसऱ्या तिमाहीत या भोपळ्यांच्या बिया खाल्ल्याने हिमोग्लोबिनची पातळी वाढते, ज्यामुळे गरोदर महिलांना शक्ती कमी होणे आणि अशक्तपणा यासारख्या समस्यांवर मात करण्यास मदत होते.
तीळ
गरोदरपणात तीळ खाणे बाळाच्या विकासासाठी खूप फायदेशीर असते. त्यामुळे पचनसंस्थाही मजबूत होते. गरोदरपणात महिलांना अनेकदा बद्धकोष्ठतेच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. तर अशावेळेस आहारतत तीळाचा समावेश करावा. कारण तीळ फॉलिक ॲसिड देखील तयार करतात. योग्य आणि सुरक्षित पद्धतीने त्यांचे सेवन केल्याने बाळातील न्यूरल ट्यूब दोषांसारख्या समस्या टाळता येतात.
तीळ खाण्याचे तोटे
गरोदरपणाच्या पहिल्या तिमाहीत तीळ खाणे अत्यंत हानिकारक आहे. तीळ खाल्ल्याने स्पॉटिग येऊ शकतात. म्हणून तीळ खाण्या आधीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
सूर्यफूलाची बियाणे
सूर्यफुलाच्या बिया गरोदर महिलांसाठी अत्यंत फायदेशीर आहेत. त्यांचे सेवन कमी प्रमाणात आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार केल्यास महिलांना गर्भअवस्थे दरम्यान फॉलिक ॲसिड, लोह आणि मॅग्नेशियम सारखे मुबलक पोषक तत्व मिळू शकतात.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
