
रांची | टीम इंडियाची इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात निराशाजनक सुरुवात झाली आहे. टीम इंडियाने इंग्लंडला दुसऱ्या दिवशी पहिल्या डावात 353 धावांवर ऑलआऊट केलं. जो रुट याने केलेल्या नाबाद 122 धावांच्या जोरावर इंग्लंडला 350 पार मजल मारता आली. टीम इंडियाकडून ऑलराउंडर रवींद्र जडेजाने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर पदार्पणवीर आकाश दीप याने इंग्लंडला 3 झटके दिले.
इंग्लंडचं पॅकअप केल्यानंतर यशस्वी जयस्वाल आणि कॅप्टन रोहित शर्मा ही मुंबईकर सलामी जोडी मैदानात आली. इंग्लंडच्या 353 धावांच्या प्रत्युत्तरात टीम इंडियाला चांगल्या सुरुवातीची अपेक्षा होती. मात्र ज्याची भीती तेच झालं. रोहित पुन्हा एकदा स्वसतात आऊट झाला. टीम इंडियाला 9 धावांवर पहिला धक्का लागला.
जेम्स एंडरसन याने रोहित शर्माला टीम इंडियाच्या डावातील तिसऱ्या ओव्हरमध्ये आऊट केलं. जेम्सने टाकलेल्या ओव्हरमधील चौथ्या बॉलवर रोहित शर्मा विकेटकीपर बेन फोक्स याच्या हाती कॅच आऊट झाला. रोहित शर्माला 9 बॉलमध्ये 2 धावाच करता आल्या. जेम्स एंडरसनने रोहित शर्माचीच पहिली विकेट मिळवून देत इंग्लंडला जबरदस्त सुरुवात करुन दिली. रोहित शर्मा झटपट आऊट झाल्याने आता यशस्वी आणि वनडाऊन शुबमन गिल या दोघांवर मोठी जबाबदारी असणार आहे.
हिटमॅन झटपट आऊट
Rohit Sharma dismissed for 2 runs pic.twitter.com/aTzMACNmGW
— Johns. (@CricCrazyJohns) February 24, 2024
दरम्यान टीम इंडियाने दुसऱ्या दिवसाच्या लंचब्रेकपर्यंत 1 विकेट गमावून 10 ओव्हरमध्ये 34 धावा केल्या आहेत. यशस्वी जयस्वाल याने 38 बॉलमध्ये 5 चौकारांच्या मदतीने नाबाद 27 धावा केल्या आहेत. तर शुबमन गिल याने 14 बॉलमध्ये नाबाद 4 धावा केल्या आहेत.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, आकाश दीप आणि मोहम्मद सिराज.
इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | बेन स्टोक्स (कर्णधार) झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेयरस्टो, बेन फोक्स, टॉम हार्टले, ओली रॉबिन्सन, जेम्स एंडरसन आणि शोएब बशीर.