IND vs ENG 2nd T20i : दुसऱ्या सामन्याच्या वेळेत बदल? किती वाजता सुरुवात होणार?

India vs England 2nd T20i Live Streaming : सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात टीम इंडियाने जॉस बटलरच्या इंग्लंडविरुद्ध विजयी सुरुवात केली आहे. या मालिकेतील दुसरा टी 20i सामना कुठे पाहायला मिळेल? जाणून घ्या.

IND vs ENG 2nd T20i : दुसऱ्या सामन्याच्या वेळेत बदल? किती वाजता सुरुवात होणार?
India vs England Hardik Tilak Varma
Image Credit source: Bcci
| Updated on: Jan 24, 2025 | 3:07 PM

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात सध्या 5 सामन्यांची टी 20i मालिका खेळवण्यात येत आहे. इंग्लंड क्रिकेट टीम या मालिकेसाठी भारत दौऱ्यावर आहे. उभयसंघातील पहिला सामना हा बुधवारी 22 जानेवारीला पार पडला. कोलकातामधील ईडन गार्डनमध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडवर 7 विकेट्सने विजय मिळवला. टीम इंडियाने या विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. त्यानंतर आता टीम इंडिया दुसऱ्या सामन्यासाठी सज्ज झाली आहे. हा दुसरा टी 20i सामना कुठे खेळवण्यात येणार? किती वाजता सुरुवात होणार? याबाबतची सर्व माहिती जाणून घेऊयात.

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड दुसरा टी 20i सामना केव्हा?

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड दुसरा टी 20i सामना शनिवारी 25 जानेवारीला खेळवण्यात येणार आहे.

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड दुसरा टी 20i सामना कुठे?

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड दुसरा टी 20i सामना चेन्नईतील एमए चिंदबरम स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड दुसऱ्या टी 20i सामन्याला किती वाजता सुरुवात होईल?

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड दुसऱ्या टी 20i सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होईल. तर 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड दुसरा टी 20i सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड दुसरा टी 20i सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तसेच फ्री एअर डीशवर डीडी स्पोर्ट्स चॅनेलवरही सामना पाहता येईल.

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड दुसरा टी 20i सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड दुसरा टी 20i सामना मोबाईलवर डिज्ने प्लस हॉटस्टार एपवर पाहायला मिळेल.

इंग्लंडविरुद्धच्या टी 20i मालिकेसाठी भारतीय संघ : सूर्यकुमार यादव (कॅप्टन), अक्षर पटेल (उपकर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, रिंकू सिंह, नीतीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, अर्शदीप सिंह, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई आणि वॉशिंगटन सुंदर.

टी 20 सीरिजसाठी इंग्लंड टीम : जोस बटलर (कर्णधार) रेहान अहमद, जोफ्रा आर्चर, गुस ऍटकिन्सन, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, जेमी स्मिथ, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, साकिब महमूद, फिल सॉल्ट आणि मार्क वुड.