IND vs ENG : काळी पट्टी बांधून टीम इंडियाचे प्लेयर्स मैदानात, जाणून घ्या कारण

World Cup 2023, IND vs ENG : भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यात भारताची सुरुवात एकदम खराब झाली आहे. आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाल्याने टीम इंडियावर दबाव वाढला आहे. पण काळी पट्टी बांधून मैदानात उतरण्याचं कारण काय? असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे.

IND vs ENG : काळी पट्टी बांधून टीम इंडियाचे प्लेयर्स मैदानात, जाणून घ्या कारण
IND vs ENG : टीम इंडियाच्या खेळाडूंनी काळी पट्टी बांधण्याचं कारण काय? नेमकं काय झालं जाणून घ्या
Image Credit source: Twitter
| Updated on: Oct 29, 2023 | 3:29 PM

मुंबई : भारत आणि इंग्लंड यांच्यात वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील 29 वा सामना सुरु आहे. इंग्लंडने या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाची सुरुवात एकदम खराब झाली. आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाल्याने टीम इंडियावर दबाव वाढला आहे. शुबमन गिल, विराट कोहली आणि श्रेयस अय्यर स्वस्तात बाद झाले. विराट कोहली याला आपलं खातंही खोलता आलं नाही. त्यामुळे कर्णधार रोहित शर्मा याच्या जबाबदारी वाढली आहे. असं असताना भारतीय संघाचे खेळाडू काळ्या रंगाचा आर्मबँड बांधून मैदानात खेळण्याचं कारण काय? असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. अनेकांना त्याचं कारण माहिती आहे. पण ज्यांना माहिती नाही त्यांना या बातमीतून उत्तर मिळेल. बीसीसीआयने ट्वीट करून याचं उत्तर दिलं आहे.

“इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाचे खेळाडू ब्लॅक आर्मबँड्स बांधून मैदानात उतरले आहेत.दिग्गज क्रिकेटपटू बिशन सिंग बेदी यांच्या स्मरणार्थ टीम इंडियाचे खेळाडूंनी काळी पट्टी बांधली आहे.”, असं ट्वीट बीसीसीआयने केलं आहे. बिशन सिंग बेदी यांचा जन्म 1946 मध्ये अमृतसरमध्ये झाला होता. वयाच्या 77 व्या बिशन सिंग बेदी यांनी जगाचा निरोप घेतला. बिशन सिंग बेदी आतापर्यंत 67 कसोटी सामने खेळला आहे. यात 266 विकेट घेतला. तसेच 14 वेळा पाच गडी बाद करण्याचा विक्रम केला आहे. त्याचबरोबर एकदा 10 गडी बाद केले आहेत. 10 वनडे सामन्यात त्यांनी 7 गडी बाद केले आहेत.

उपांत्य फेरीचं गणित

इंग्लंड विरुद्धचा सामना भारताने जिंकल्यास उपांत्य फेरीचं स्थान निश्चित होणार आहे. पण हा सामना भारताने गमावल्यास आणखी एक विजयासाठी थांबावं लागेल. दुसरीकडे इंग्लंडने हा सामना गमवल्यास स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येणार आहे. त्यामुळे इंग्लंडसाठी करो या मरोची लढाई आहे.

दोन्ही संघांचे खेळाडू

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज

इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): जॉनी बेअरस्टो, डेविड मलान, जो रूट, बेन स्टोक्स, जोस बटलर (कर्णधार/विकेटकीपर), लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, ख्रिस वोक्स, डेव्हिड विली, आदिल रशीद, मार्क वुड