World Cup 2023 | इंडिया-इंग्लंड सामन्याच्या काही दिवसांआधी टीमला झटका, स्टार खेळाडू वर्ल्ड कपमधून आऊट

Icc World Cup 2023 | टीम इंडिया आपला पुढील सामना हा इंग्लंड विरुद्ध खेळणार आहे. हा सामना 29 ऑक्टोबरला होणार आहे. त्याआधी स्टार खेळाडू वर्ल्ड कपमधून बाहेर झाला आहे.

World Cup 2023 | इंडिया-इंग्लंड सामन्याच्या काही दिवसांआधी टीमला झटका, स्टार खेळाडू वर्ल्ड कपमधून आऊट
| Updated on: Oct 23, 2023 | 3:49 AM

मुंबई | आयसीसी वनडे वर्ल्ड कप स्पर्धेचा थरार सुरु आहे. क्रिकेट चाहत्यांना आतापर्यंत अनेक रंगतदार सामने पाहायला मिळाले आहेत. अफगाणिस्तान-नेदरलँड्स या दोन्ही संघांनी इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका टीमला पराभूत केलं. त्यामुळे स्पर्धेत चांगलीच रंगत आली आहे. या स्पर्धेदरम्यान अनेक खेळाडूंना दुखापतही झाली आहे. टीम इंडियाच्या हार्दिक पंड्या यालाही पुण्यात बांगलादेश विरुद्धच्या सामन्यादरम्यान दुखापत झाली. हार्दिकला या दुखापतीमुळे न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यातून बाहेर पडावं लागलं. त्यानंतर आता मोठी बातमी समोर आली आहे.

टीम इंडिया आणि इंग्लंड हे दोन्ही संघ वर्ल्ड कपमधील सामना हा खेळणार आहेत. हा सामना 29 ऑक्टोबर रोजी होणार आहे. या सामन्याआधी टीमला मोठा झटका लागला आहे. टीमचा मॅचविनर खेळाडू हा उर्वरित वर्ल्ड कपमधून बाहेर पडला आहे. त्यामुळे टीमचं टेन्शन दुप्पटीने वाढलं आहे. तो खेळाडू कोण आहे हे जाणून घेऊयात.

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज रीसे टॉपली हा दुखापतीमुळे वर्ल्ड कपमधून बाहेर पडला आहे. इंग्लंड क्रिकेट टीमने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. रीसे टॉपली याच्या बोटाला दुखापत झाली होती. त्यामुळे रीसे वर्ल्ड कपमधून बाहेर झाला आहे. इंग्लंडने आधीच 4 पैकी 3 सामने गमावले आहेत. इंग्लंडची वर्ल्ड कपमध्ये वाईट स्थिती आहे. वर्ल्ड कप विजेता टीम पॉइंट्स टेबलमध्ये शेवटुन दुसऱ्या म्हणजे नवव्या क्रमांकावर आहे. त्यात टॉपलीचं बाहेर पडणं हे इंग्लंडला चांगलंच महागात पडणार आहे.

दरम्यान इंग्लंडने आतापर्यंत या वर्ल्ड कपमध्ये एकूण 4 सामने खेळले आहेत. इंग्लंडला या 4 पैकी फक्त 1 सामना जिंकण्यात यश आलं आहे. तर 3 वेळा पराभूत व्हावं लागलंय. इंग्लंडला न्यूझीलंड, अफगाणिस्तान आणि न्यूझीलंडकडून पराभव स्वीकारावा लागलाय. त्यामुळे आता इंग्लंडसाठी रिसे टॉपली याच्याशिवाय वर्ल्ड कपमध्ये खेळणं आव्हानात्मक ठरणार आहे.

इंग्लंडला मोठा धक्का


इंग्लंड टीम | जोस बटलर (कॅप्टन), मोईन अली, गुस ऍटकिन्सन, जॉनी बेअरस्टो, सॅम कुरन, लियाम लिव्हिंगस्टोन, डेविड मलान, आदिल रशीद, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स, रीस टोपली, डेव्हिड विली, मार्क वुड आणि ख्रिस वोक्स.