IND vs ENG | विराटनंतर टीम इंडियाला आणखी एक झटका, आता कोण बाहेर?

| Updated on: Jan 25, 2024 | 9:44 AM

India vs England 1st Test | विराट कोहली याने पहिल्या 2 कसोटीतून माघार घेतल्याने टीम इंडिया अडचणीत होती. ही अडचण आता दुप्पटीने वाढली आहे. टीम इंडियाचा स्टार गोलंदाज यानेही माघार घेतली आहे.

IND vs ENG | विराटनंतर टीम इंडियाला आणखी एक झटका, आता कोण बाहेर?
team india national anthem test
Follow us on

हैदराबाद | टीम इंडियाने इंग्लंड विरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात टॉस गमावला आहे. हैदराबादमधील राजीव गांधी स्टेडियममध्ये सकाळी 9 वाजता टॉस पार पडला. बेन स्टोक्स याने कसलाही विचार न करता थेट बॅटिंगचा निर्णय घेतला. इंग्लंड 3 स्पिनर्स आणि 1 फास्टरसह खेळणार आहे. तर दुसऱ्या बाजूला टीम इंडियाला एक मोठा झटका लागला आहे. विराट कोहली याच्यानंतर आणखी एक खेळाडू बाहेर पडला आहे.

विराट कोहली याने वैयक्तिक कारणामुळे पहिल्या 2 सामन्यांमधून माघार घेतली आहे. त्याच्या जागी इंदूरमधील रजत पाटीदार याला संधी देण्यात आली आहे. तर दुसऱ्या बाजूला आवेश खान हा देखील बाहेर पडला आहे. बीसीसीआयने ट्विट करुन याबाबतची माहिती दिली आहे.

हे सुद्धा वाचा

आवेश खान याला रणजी ट्रॉफी स्पर्धेसाठी मुक्त करण्यात आलं आहे. रणजी स्पर्धेत आवेश खान मध्यप्रदेश टीमचं प्रतिनिधित्व करतो. मध्यप्रदेशचा सामना असल्याने आवेशला मुक्त करण्यात आलं असल्याचं बीसीसीआयने नमूद केलं आहे. तर विराटच्या जागी रजत पाटीदारला 2 कसोटींसाठी संघात घेतलंय. मात्र त्याला प्लेईंग ईलेव्हनमध्ये संधी मिळाली नाही.

आवेश खान रणजी ट्रॉफीत खेळणार

पहिल्या कसोटीसाठी इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेयरस्टो, बेन फॉक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, मार्क वुड, टॉम हार्टले आणि जॅक लीच.

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, केएल राहुल, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, श्रीकर भारत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.