IND vs ENG : “आम्ही चेन्नईत दुसऱ्या सामन्यात…”, इंग्लंडचा दुसऱ्या टी 20i आधी टीम इंडियाला थेट इशारा!

India vs England 2nd T20i : टीम इंडियाने कोलकातात धमाकेदार विजय मिळवत पाहुण्याच इंग्लंड संघाचा धुव्वा उडवला. इंग्लंड या पराभानंतर आता एक्शन मोडमध्ये आली आहे.

IND vs ENG : आम्ही चेन्नईत दुसऱ्या सामन्यात..., इंग्लंडचा दुसऱ्या टी 20i आधी टीम इंडियाला थेट इशारा!
hardik pandya ind vs eng
Image Credit source: Bcci
| Updated on: Jan 23, 2025 | 8:21 PM

इंग्लंड क्रिकेट टीमच्या भारत दौऱ्याची सुरुवात पराभवाने झाली. इंग्लंड टीम इंडियाविरुद्ध 5 सामन्यांची टी 20i मालिका खेळणार आहे. तर त्यानंतर उभयसंघात 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका होणार आहे. टीम इंडियाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात इंग्लंडवर धमाकेदार विजय मिळवला. बुधवारी 22 जानेवारीला ईडन गार्डमध्ये पहिला टी 20i सामना खेळवण्यात आला. टीम इंडियाने हा सामना 7 विकेट्सने जिंकत मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. तसेच टीम इंडियाने यासह नववर्षाची विजयाने सुरुवात केली.

टीम इंडियाच्या गोलंदाजांनी इंग्लंडला 132 धावांवर गुंडाळलं. त्यानंतर भारताने 133 धावांचं आव्हान 12.5 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून पूर्ण केलं. आता उभयसंघातील दुसरा सामना हा शनिवारी 25 जानेवारीला होणार आहे. इंग्लंडने त्या सामन्याआधी टीम इंडियाला थेट इशारा दिला आहे. इंग्लंड क्रिकटने एक्स या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट करत हा इशारा दिला आहे.

एक्स पोस्टमध्ये काय म्हटलंय?

“कोलकातामध्ये पराभव. आम्ही चेन्नईत दुसऱ्या टी२० मध्ये पुनरागमन करण्याचा प्रयत्न करू”, असं म्हणत इंग्लंडने एका प्रकारे टीम इंडियाला बाऊन्सबॅक करण्याचा इशाराच दिला आहे. इंग्लंडची पहिल्या सामन्यातील अशा पराभवामुळे जखमी वाघासारखी स्थिती झाली आहे. त्यामुळे इंग्लंड दुसऱ्या सामन्यात पलटवार करण्याच्या तयारीनेच मैदानात उतरणार आहे. त्यामुळे टीम इंडियासमोर या इंग्लंडला जशास तसं उत्तर देण्याचं आव्हान असणार आहे. त्यामुळे आता दुसऱ्या सामन्यात टीम इंडिया सलग दुसरा विजय मिळवून आघाडी घेते की इंग्लंड मालिकेत बरोबरी साधते? हे सामन्यानंतरच स्पष्ट होईल.

इंग्लंडविरुद्धच्या टी 20i मालिकेसाठी भारतीय संघ : सूर्यकुमार यादव (कॅप्टन), अक्षर पटेल (उपकर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, रिंकू सिंह, नीतीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, अर्शदीप सिंह, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई आणि वॉशिंगटन सुंदर.

टी 20 सीरिजसाठी इंग्लंड टीम : जोस बटलर (कर्णधार) रेहान अहमद, जोफ्रा आर्चर, गुस ऍटकिन्सन, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, जेमी स्मिथ, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, साकिब महमूद, फिल सॉल्ट आणि मार्क वुड.