IND vs IRE 2nd T20 : दुसऱ्या टी20 सामन्यात बुमराह या खेळाडूंना देणार संधी! जाणून घ्या कोणते प्लेयर्स ठरतील लकी आणि पिच रिपोर्ट

IND vs IRE 2nd T20 : भारताने तीन सामन्यांच्या टी20 मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात कसं असेल गणित याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. कोणती प्लेइंग इलेव्हन ठरेल लकी या बाबत अंदाज घ्या

IND vs IRE 2nd T20 : दुसऱ्या टी20 सामन्यात बुमराह या खेळाडूंना देणार संधी! जाणून घ्या कोणते प्लेयर्स ठरतील लकी आणि पिच रिपोर्ट
IND vs IRE 2nd T20 : दुसऱ्या टी20 सामन्यात या खेळाडूंवर असेल नजर, हे प्लेसर्स ठरतील बाजीगर; पिच रिपोर्ट आणि इतर अंदाज जाणून घ्या
| Updated on: Aug 19, 2023 | 3:23 PM

मुंबई : भारताने आयर्लंड दौऱ्याची सुरुवात विजयाने केली आहे. शुक्रवारी डब्लिन येथे खेळलेल्या पहिल्या सामन्यात भारताने 2 धावांनी विजय मिळवला आणि मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. आता दुसरा टी20 सामना जिंकताच मालिका भारताच्या खिशात जाणार आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींच्या दुसऱ्या सामन्याकडे नजरा लागून आहेत. कोणत्या खेळाडूंसह टीम इंडिया मैदानात उतरेल आणि कोणते खेळाडू मैदान गाजवतील याबाबत अंदाज बांधला जात आहे. विशेष म्हणजे तिनही सामने डब्लिन मैदानातच होणार आहेत. त्यामुळे खेळपट्टी आपलं वेगळं स्वरूप दाखवू शकते. त्याचा फायदा आणि तोटा दोन्ही संघांना बसू शकतो. त्यामुळे खेळपट्टीचा अंदाज घेऊन कर्णधार खेळाडूंची निवड करतील यात काही शंका नाही.

पिच रिपोर्ट

तीन सामन्यांची टी20 मालिका एकाच मैदानावर आहे. त्यामुळे दिवसागणित त्यात काही बदल घडतील यात शंका नाही. सुरुवातील फलंदाजांना मदत करणारी खेळपट्टी गोलंदाजांच्या बाजूने झुकू शकते. कारण थंड वातावरण आणि पाऊस झाल्याने खेळपट्टीवर फलंदाजी करणं वाटतं तितकं सोपं नाही. त्यामुळे नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करणं कर्णधार पसंत करतील. वेगवान गोलंदाजांसोबत फिरकीपटू हे मैदाना गाजवतील. धावांचा पाठलाग करणाऱ्या संघांची विजयी टक्केवारी 60 टक्के आहे. त्यामुळे धावांचा डोंगर आणि फटकेबाजी यावर गणितं बदलून जातील यात शंका नाही.

टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदल होतील का?

टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होणं तसं कठीण आहे. कारण निवडलेल्या खेळाडूंना अपेक्षित कामगिरी करण्याची संधी तशी मिळालेली नाही. त्यामुळे त्याच प्लेइंग 11 सह जसप्रीत बुमराह मैदानात उतरेल. तीन वेगवान गोलंदाज आणि 2 स्पिनर्ससह संघ खेळेल.

हे खेळाडू ठरतील लकी!

यशस्वी जयस्वाल आणि जसप्रीत बुमराह या सामन्यात चांगली कामगिरी करतील अशी दाट शक्यता आहे. कर्णधार म्हणून याची निवड फायद्याची ठरू शकते. पण सामन्यात कधीही काहीही होऊ शकतं. पण त्यातल्या त्यात हे खेळाडू प्रभावी कर्णधार ठरू शकतात. त्याचबरोबर हॅरी टेक्टर, ऋतुराज गायकवाड यांना संघातील स्थान गुणांच्या दृष्टीकोनातून चांगले ठरतील असा अंदाज वर्तवला जात आहे. जॉर्ज डॉकरेल, वॉशिंग्टन सुंदर हे खेळाडूही सामना कधीही फिरवू शकतात.

लकी इलेव्हन 1

  • विकेटकीपर – संजू सॅमसन, लॉरकन टकर
  • बॅट्समन- पॉल स्टीर्लिंग, हॅरी टेक्टर, ऋतुराज गायकवाड, यशस्वी जयस्वाल (कर्णधार), तिलक वर्मा
  • अष्टपैलू- वॉशिंग्टन सुंदर, कर्टिस कॅम्पर
  • गोलंदाज- जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), अर्शदीप सिंग

लकी इलेव्हन 2

  • विकेटकीपर – संजू सॅमसन
  • बॅट्समन- पॉल स्टीर्लिंग, हॅरी टेक्टर, ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल , तिलक वर्मा
  • अष्टपैलू- वॉशिंग्टन सुंदर, कर्टिस कॅम्पर
  • गोलंदाज- जसप्रीत बुमराह (कर्णधार), प्रसिद्ध कृष्णा