IND vs NHNTS: 8 धावात टॉप ऑर्डर कोसळली, संकटात असूनही जिंकला भारत, हाफ सेंच्युरी झळकवणारा हर्षल पटेल हिरो

| Updated on: Jul 04, 2022 | 11:30 AM

इंग्लंड विरुद्ध मुख्य टी 20 सीरीजला सुरुवात होण्याआधी भारतीय संघ दोन सराव सामने खेळला. काल झालेल्या दुसऱ्यासराव सामन्यात भारताने नॉर्थम्प्टनशायरवर (ind vs nhnts) विजय मिळवला.

IND vs NHNTS: 8 धावात टॉप ऑर्डर कोसळली, संकटात असूनही जिंकला भारत, हाफ सेंच्युरी झळकवणारा हर्षल पटेल हिरो
harshal patel
Image Credit source: twitter
Follow us on

मुंबई: इंग्लंड विरुद्ध मुख्य टी 20 सीरीजला सुरुवात होण्याआधी भारतीय संघ दोन सराव सामने खेळला. काल झालेल्या दुसऱ्यासराव सामन्यात भारताने नॉर्थम्प्टनशायरवर (ind vs nhnts) विजय मिळवला. दुसऱ्यासामन्यात भारताच्या विजयाचा हिरो ठरला हर्षल पटेल. (Harshal patel) सराव सामन्यांसाठी दिनेश कार्तिककडे (Dinesh Karthik) संघाच नेतृत्व सोपवण्यात आलं होतं. भारताने दुसरा सामना 10 धावांनी जिंकला. भारताने आपला पहिला सराव सामना 7 विकेट आणि 20 चेंडू राखून जिंकला होता. भारताने दोन्ही सामन्यात मिळवलेला विजय बिलकुल वेगळा आहे. पहिल्या टी 20 सामन्यात शानदार विजय मिळवला. दुसऱ्या टी 20 सामन्यात भारताचा संघ अडचणीत सापडला होता. पण त्यातून सावरुन विजय मिळवला.

निम्मा संघ तंबूत परतला, त्यावेळी हर्षल पटेल उभा राहिला

दुसऱ्या टी 20 सराव सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी केली. सुरुवात चांगली झाली नव्हती. 10 धावातच टॉप ऑर्डरचे पहिले तीन फलंदाज माघारी परतले होते. संघाची धावसंख्या 72 असताना निम्मा संघ तंबूत परतला होता. डावाच्या अखेरीस निर्धारित 20 ओव्हर्समध्ये भारताच्या 8 बाद 149 धावा होत्या. हर्षल पटेलमुळे भारताला 150 च्या जवळपास पोहोचता आलं. हर्षल पटेलने 36 चेंडूत 54 धावा फटकावल्या. यात पाच चौकार आणि तीन षटकार आहेत.

भारताकडून कोणी, किती विकेट घेतल्या?

भारताच्या 150 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या नॉर्थम्प्टनशायरच्या टीमला पूर्ण 20 षटकही खेळता आली नाहीत. भारताच्या धारदार गोलंदाजीसमोर नॉर्थम्प्टनशायरचा संघ 19.3 षटकात 139 धावात ऑलआऊट झाला. भारताने 10 धावांनी हा सामना जिंकला. भारताकडून चहल, अर्शदीप, आवेश खान आणि हर्षल पटेलने प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या. वेंकटेश अय्यर आणि प्रसिद्ध कृष्णाने 1-1 विकेट घेतली. वॉर्म अप मॅचमध्ये भारताने सहा गोलंदाज वापरले. सर्वांनीच विकेट घेतल्या.

हे सुद्धा वाचा

पहिल्या सामन्याचा हिरो दीपक हुड्डा

पहिल्या सराव सामन्यात डर्बीशायर संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 ओव्हर्समध्ये भारतीय संघासमोर विजयासाठी 151 धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारताने 20 चेंडू बाकी राखून आणि तीन विकेट गमावून हे लक्ष्य पार केले. आयर्लंड विरुद्ध दुसऱ्या टी 20 मध्ये शानदार शतक झळकावणाऱ्या दीपक हुड्डाने पुन्हा एकदा शानदार प्रदर्शन केलं. त्याने 37 चेंडूत 59 धावा फटकावल्या. सूर्यकुमार यादवने 26 चेंडूत नाबाद 36 धावा केल्या. संजू सॅमसनने 38 रन्स केल्या.