AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईच्या महापाैरांवर किशोरी पेडणेकर यांची जोरदार टीका, म्हणाल्या, त्यांना…

मुंबई महापालिकेच्या महाापाैर रितू तावडे यांनी गाडीवर लाल दिवा लावल्याने त्यांच्यावर जोरदार टीका होताना दिसत आहेत. त्यामध्येच आता किशोरी पेडणेकर यांनी या मुद्द्यावरून रितू तावडे यांचा चांगलाच समाचार घेतल्याचे बघायला मिळत आहे.

मुंबईच्या महापाैरांवर किशोरी पेडणेकर यांची जोरदार टीका, म्हणाल्या, त्यांना...
Kishori Pednekar
| Updated on: Mar 15, 2026 | 12:59 PM
Share

मुंबईच्या महापाैर रितू तावडे या गाडीवर लावलेल्या लाल दिव्यामुळे टिकेच्या धनी ठरत आहेत. गाडीवर लाल दिवा लावण्याची परवानगी नसतानाही त्यांनी लाल दिवा लावल्याने त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. याबद्दल बोलताना शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबई महापालिकेच्या माजी महापाैर किशोरी पेडणेकर यांनी रितू तावडे यांच्यावर थेट टीका केली. महापौर रितू तावडे यांच्या अधिकृत गाडीवरील लाल दिवे काढण्यात आल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे. नियमांचे पालन करत हे दिवे हटवण्यात आल्याचेही अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सध्या महापौरांच्या गाडीवर कोणतेही विशेष दिवे नसल्याचे संबंधित अधिकाऱ्याकडून सांगण्यात आलं आहे. पुढे बोलताना किशोरी पेडणेकर यांनी म्हटले की, 2017 ला यावर फार मोठी चर्चा झाली आणि त्यानंतर अश्या गाडीवर लाल निळे दिवे लावले जाऊ नयेत असा नियम झाला.

मी सुद्धा महापौर राहिलेली आहे, मला जे नियम सांगण्यात आलेले होते त्यानुसार मी त्याचे प्रोटोकॉल पाळले होते. मी महापौर असताना फैमिलीसाठी असणारी गाडी मी नाकारली होती आणि तेच मानधन मुंबईकरांसाठी दिले. प्रोटोकॉल विचारून महापौरांनी माहिती घेतली नाही का? कोणाच्या सांगण्यावरून तुम्ही दिव्याची गाडी वापरली? मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिलेल्या बदल्यांचे आदेश काढण्याचे अधिकार तुम्हाला आहेत का? असेही प्रश्न पेडणेकर यांनी उपस्थित केले.

पुढे बोलताना किशोरी पेडणेकर यांनी म्हटले की, तुम्ही म्हणताय आधीच्या महापौर कधीच दिसल्या नाहीत? तुम्हाला काम करणाऱ्या महापौर कश्या दिसतील. मी महापौर असताना कधीही मुंबईच्या बाहेर गाडी नेली नव्हती.मी महापौर झाल्यानंतर फक्त एकदाच माझ्या कुलदैवतेला गाडी घेऊन गेली होती ती माझी भावना होती.

मी कधीही लाल दिव्याचा मोह केला नाही महापौरांनाही तो टाळता आला असता, असे म्हणत किशोरी पेडणेकर यांनी मुंबई महापालिकेच्या महापाैर रितू तावडे यांच्यावर जोरदार टीका केली. आता रितू तावडे यांच्यावर लाल दिव्याच्या गाडीवरून टीका होत असतानाच यावर थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मोठे भाष्य केले.

Follow Us
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानद डॉक्टर ऑफ सायन्स पदवी प्रदान
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानद डॉक्टर ऑफ सायन्स पदवी प्रदान.
गॅससिलेंडरवरून राजकारण तापलं;अफवांमुळे रांगा लागल्याचा फडणवीसांचा दावा
गॅससिलेंडरवरून राजकारण तापलं;अफवांमुळे रांगा लागल्याचा फडणवीसांचा दावा.
इंधन टंचाईवरून राजकारण तापलं; संजय राऊतांचा मोदी-फडणवीसांवर निशाणा
इंधन टंचाईवरून राजकारण तापलं; संजय राऊतांचा मोदी-फडणवीसांवर निशाणा.
मुंबईच्या महापौर रितू तावडे वादाच्या भोवऱ्यात? 2017 चा मोठा नियम मोडला
मुंबईच्या महापौर रितू तावडे वादाच्या भोवऱ्यात? 2017 चा मोठा नियम मोडला.
LPG चं टेंशन संपणार! नागरिकांना मोठा दिलासा, चंद्रपूरमधून....
LPG चं टेंशन संपणार! नागरिकांना मोठा दिलासा, चंद्रपूरमधून.....
नागरिकांनो घाबरू नका, राज्यात गॅसचा तुटवडा नाही, भुजबळ यांनी थेट....
नागरिकांनो घाबरू नका, राज्यात गॅसचा तुटवडा नाही, भुजबळ यांनी थेट.....
युद्धाचा परिणाम मुंबईतील ड्रायफ्रूट मार्केटवर, सुकामेव्याच्या दरात....
युद्धाचा परिणाम मुंबईतील ड्रायफ्रूट मार्केटवर, सुकामेव्याच्या दरात.....
आखाती युद्धाचा फटका शेतकऱ्यांना, हळदीचे दर घसरले, शेतकरी अडचणीत
आखाती युद्धाचा फटका शेतकऱ्यांना, हळदीचे दर घसरले, शेतकरी अडचणीत.
काँग्रेसने खोट्या रील्सची इंडस्ट्री सुरू केली– मोदींचा हल्लाबोल
काँग्रेसने खोट्या रील्सची इंडस्ट्री सुरू केली– मोदींचा हल्लाबोल.
फडणवीसांचं गॅस तुटवड्यावर मोठं विधान, काँग्रेसवर केला घणाघाती हल्ला
फडणवीसांचं गॅस तुटवड्यावर मोठं विधान, काँग्रेसवर केला घणाघाती हल्ला.