IND vs NZ : सर्फराजचं दीडशतक, पंतच्या 99 धावा, टीम इंडिया 462 वर ऑलआऊट, न्यूझीलंडला 107 धावांचं आव्हान

India vs New Zealand 1st Test Day 4 : टीम इंडियाने न्यूझीलंडसमोर 107 धावांचं आव्हान ठेवलं आहे. रोहितसेना या धावांचा बचाव करणार का?

IND vs NZ : सर्फराजचं दीडशतक, पंतच्या 99 धावा, टीम इंडिया 462 वर ऑलआऊट, न्यूझीलंडला 107 धावांचं आव्हान
sarfaraz khan and rishabh pant
Image Credit source: Bcci
| Updated on: Oct 19, 2024 | 5:55 PM

टीम इंडियाने न्यूझीलंडला पहिल्या कसोटी सामन्यातील चौथ्या दिवशी विजयासाठी 107 धावांचं आव्हान दिलं आहे. टीम इंडियाने दुसऱ्या डावात न्यूझीलंडच्या 356 धावांच्या प्रत्युत्तरात 99.3 ओव्हरमध्ये ऑलआऊट 462 धावा केल्या. टीम इंडियाने यासह 106 धावांची आघाडी घेतली. त्यामुळे आता न्यूझीलंडला 107 धावांचं आव्हान मिळालं. सामन्यात चौथ्या दिवसात काही षटकांचा आणि पाचव्या दिवसाचा संपूर्ण खेळ बाकी आहे. त्यामुळे सामन्याचा निकाल लागणार हे स्पष्ट आहे. आता टीम इंडियाचे गोलंदाज या 107 धावांचा बचाव करणार का? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.

उभयसंघातील पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे वाया गेला. दुसऱ्या दिवशी पावसाने उसंत घेतल्याने टॉस झाला. टीम इंडियाने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. मात्र न्यूझीलंडने टीम इंडियाने 46 धावांवर गुंडाळलं. त्यानंतर सातव्या विकेटसाठी रचीन रवींद्र आणि टीम साऊथी या दोघांनी केलेल्या 137 धावांच्या जोरावर न्यूझीलंडने 402पर्यंत मजल मारली आणि 356 धावांची मजबूत आघाडी घेतली.

टीम इंडियाने या 356 च्या प्रत्युत्तरात दुसऱ्या डावात ऑलआऊट 462 धावा केल्या. टीम इंडियाकडून दुसऱ्या डावात सर्फराज खान याने सर्वाधिक 150 धावांचं योगदान दिलं. ऋषभ पंतने 99 धावा केल्या. विराटने 70 आणि रोहितने 52 धावा केल्या. यशस्वीने 35, केएल राहुल 12 आणि आर अश्विनने 15 धावा जोडल्या. रवींद्र जडेजाने 5 धावा केल्या. तर कुलदीप यादव 6 धावांवर नाबाद परतला. तर जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज या दोघांना भोपळाही फोडता आला नाही. तर न्यूझीलंडकडून मॅट हॅन्री आणि विलियम ओरुर्के या दोघांनी प्रत्येकी 3-3 विकेट्स घेतल्या. तर अझाज पटेलने दोघांना बाद केलं. तर टीम साऊथी आणि ग्लेन फिलिप्स या दोघांच्या खात्यात 1-1 विकेट गेली.

टीम इंडिया न्यूझीलंडला रोखणार?

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, विराट कोहली, सर्फराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

न्यूझीलंड प्लेइंग ईलेव्हन : टॉम लॅथम (कॅप्टन), डेव्हॉन कॉनवे, विल यंग, ​​रचीन रवींद्र, डॅरिल मिचेल, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मॅट हेन्री, टीम साउथी, एजाझ पटेल आणि विल्यम ओरूर्के.