IND vs NZ : टीम इंडियाने लाज घालवली, 12 वर्षांनी मायदेशात मालिका गमावली, न्यूझीलंड दुसऱ्या सामन्यात 113 धावांनी विजयी

India vs New Zealand 2nd Test Match Result : टीम इंडियाने भारतावार दुसऱ्या कसोटी सामन्यात 113 धावांनी मात करत मालिका जिंकली आहे. न्यूझीलंडने 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली आहे.

IND vs NZ : टीम इंडियाने लाज घालवली, 12 वर्षांनी मायदेशात मालिका गमावली, न्यूझीलंड दुसऱ्या सामन्यात 113 धावांनी विजयी
mitchell santner india vs new zealand 2nd test
Image Credit source: blackcaps x account
| Updated on: Oct 26, 2024 | 4:28 PM

न्यूझीलंड क्रिकेट टीमने इतिहास रचला आहे. श्रीलंकेत 0-2 ने कसोटी मालिका गमावल्यानंतर आता न्यूझीलंडने भारत दौऱ्यात टीम इंडियाचा धुव्वा उडवला आहे. न्यूझीलंडने बंगळुरुनंतर पुण्यात सलग दुसरा सामना जिंकत मालिकेवर नाव कोरलं आहे. न्यूझीलंडने दुसऱ्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवशी शेवटच्या सत्रात टीम इंडियावर 113 धावांनी विजय मिळवला आहे. न्यूझीलंडने टीम इंडियाला विजयासाठी 359 धावांचं आव्हान मिळालं होतं. मात्र न्यूझीलंडने टीम इंडियाला 245 धावांवर गुंडाळलं आणि 2-0 ने मालिका जिंकली.

टीम इंडियाने लाज घालवली

टीम इंडियाने मायदेशातील मालिका पराभवासह लाज घालवली आहे. भारतावर मायदेशात सलग 18 मालिका आणि 4 हजार 332 दिवसांनंतर कसोटी मालिका गमावण्याची वेळ आली. भारताला 2012 नंतर घरात कसोटी मालिकेत पराभूत करणारी न्यूझीलंड पहिली टीम ठरली आहे. याआधी इंग्लंडने 2012 मध्ये टीम इंडियाला कसोटी मालिकेत धुळ चारली होती.

मिचेल सँटनर विजयाचा शिल्पकार

मिचेल सँटनरने न्यूझीलंडला विजय मिळवून देण्यात निर्णायक भूमिका बजावली. सँटनरने दोन्ही डावात मिळून एकूण 13 विकेट्स घेतल्या. सँटनरने दोन्ही डावात प्रत्येकी 5-5 विकेट्स घेतल्या. सँटरने पहिल्या डावात 7 आणि दुसर्‍या डावात 6 जणांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. सँटनर एकटाच टीम इंडियावर वरचढ ठरला. सँटनरने आपल्या फिरकीच्या जाळ्यात भारतीय फलंदाजांना फसवलं आणि ही कामगिरी केली.

सामन्यात काय झालं?

न्यूझीलंडने टॉस जिंकला. न्यूझीलंडने पहिल्या डावात 259 धावा केल्या. भारताचा पहिला डाव हा 156 वर आटोपला. न्यूझीलंडने 103 धावांच्या आघाडीसह दुसर्‍या डावात 255 धावा केल्या. त्यामुळे टीम इंडियाला विजयासाठी 359 रन्संच टार्गेट मिळालं. मात्र न्यूझीलंडने 245 रन्सवर रोखत मालिका जिंकली.

भारताचा 2012 नंतर मायदेशात मालिका पराभव

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सर्फराज खान, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, रवीचंद्रन अश्विन, आकाश दीप आणि जसप्रीत बुमराह

न्यूझीलंड प्लेइंग ईलेव्हन : टॉम लॅथम (कॅप्टन), डेव्हॉन कॉनवे, विल यंग, ​​रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, टिम साउथी, एजाज पटेल आणि विल्यम ओरुर्के.