IND vs NZ : टीम इंडियाची मुंबईत प्रतिष्ठा पणाला, न्यूझीलंड इतिहास रचण्यासाठी सज्ज, 24 वर्षांनंतर पहिल्यांदाच असं होणार?

India vs New Zealand 3rd Test : न्यूझीलंड 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे. त्यामुळे टीम इंडियाची तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

IND vs NZ : टीम इंडियाची मुंबईत प्रतिष्ठा पणाला, न्यूझीलंड इतिहास रचण्यासाठी सज्ज, 24 वर्षांनंतर पहिल्यांदाच असं होणार?
rishabh pant virat rohit team india
Image Credit source: bcci
| Updated on: Oct 28, 2024 | 6:43 PM

टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील 3 सामन्यांच्या मालिकेतील अंतिम सामना हा 1 नोव्हेंबरपासून मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. न्यूझीलंडने पहिले 2 सामने जिंकून मालिका आपल्या नावावर केली आहे. न्यूझीलंडने यासह भारतात पहिल्यांदा कसोटी मालिका जिंकली. तर टीम इंडियाने मायदेशात 12 वर्षांनी कसोटी मालिका गमावली. न्यूझीलंड या मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे. त्यामुळे न्यूझीलंडचं लक्ष्य हे आता टीम इंडियाचा व्हाईट वॉश करण्याकडे असणार आहे. तर दुसऱ्या बाजूला टीम इंडिया व्हाईटवॉश टाळण्याचा प्रयत्न असणार आहे. न्यूझीलंड तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात टीम इंडियाचा आणखी एक रेकॉर्ड उद्धवस्त करण्याच्या प्रयत्नाने मैदानात उतरणार आहेत. तर रोहितसेनेची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

न्यूझीलंडकडे 3 किंवा त्यापेक्षा अधिक सामन्यांच्या मालिकेत भारताला व्हाईटवॉश देण्याचा बहुमान मिळवण्याची संधी आहे. टीम इंडियाच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात असं एकदाही झालेलं नाही. कोणत्याही संघाला भारतात अद्याप 3 किंवा त्यापेक्षा अधिक सामन्यांच्या मालिकेत व्हाईटवॉशने विजय मिळवता आलेला नाही. त्यामुळे टीम इंडियाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाच्या कामगिरीकडे लक्ष असणार आहे.

टीम इंडियाने अखेरीस 2000 साली मायदेशात कसोटी मालिका गमावली होती. तेव्हा दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाला 2-0 ने व्हाईटवॉश दिला होता. भारताला सचिन तेंडुलकर याच्या नेतृत्वात हा व्हाईटवॉश स्वीकारावा लागला होता. तेव्हा टीम इंडियाला चारही डावांमध्ये 250 धावांचा आकडाही पार करता आला नव्हता. तेव्हा हन्सी क्रोनिए हा दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार होता.

श्रीलंका क्रिकेट टीम 1997 साली भारत दौऱ्यावर आली होती. तेव्हाच टीम इंडियाला 3 सामन्यांच्या मालिकेत एकही मॅच जिंकता आली नव्हती. हा मालिकाच 0-0 ने बरोबरीत सुटली होती. तेव्हा सचिन तेंडुलकर टीम इंडियाचा तर अर्जुन राणातुंगा श्रीलंकेचा कर्णधार होता.

तिसऱ्या सामन्यासाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सर्फराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप आणि वॉशिंग्टन सुंदर.

तिसऱ्या सामन्यासाठी न्यूझीलंड टीम : टॉम लॅथम (कॅप्टन), टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), मार्क चॅपमॅन, डेव्हॉन कॉनव्हे, मॅट हेनरी, डॅरल मिचेल, विल ओ रुर्के, एझाज पटेल, ग्लेन फिलिप्स, रचीन रवींद्र, मिचेल सँटनर, जेकब डफी, इश सोढी (दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीसाठी), टीम साउथी, केन विलियमसन आणि विल यंग.