
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत भारताने करून दाखवलं आहे. या स्पर्धेत एन्ट्री घेण्यापूर्वी टीम इंडियाच्या निवडीवरून बरेच प्रश्न उपस्थित केले जात आहेत. चार फिरकीपटू घेतल्याने टीका झाली होती. पण जेतेपद मिळवल्यानंतर ही निवड योग्य होती असंच म्हणावं लागेल. अंतिम सामन्यात नाणेफेकीचा कौल न्यूझीलंडच्या बाजूने लागला आणि त्यांना मनासारखा निर्णय घेता आला. पण भारताला विजयापासून रोखणं काही जमलं नाही. भारताने अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा 4 विकेट आणि 6 चेंडू राखून पराभव केला. यासह तिसऱ्यांदा जेतेपदावर नाव कोरलं. भारताने 12 वर्षानंतर चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा जिंकली.
भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत जबदस्त कामगिरी केली. भारताने या स्पर्धेत एकही सामना गमावला नाही. साखळी फेरीत बांगलादेश, पाकिस्तान आणि न्यूझीलंडला पराभूत केलं आणि उपांत्य फेरी गाठली होती. उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं. त्यानंतर अंतिम फेरीत न्यूझीलंडचा धुव्वा उडवला आणि जेतेपदावर नाव कोरलं. न्यूझीलंडने अंतिम फेरीत विजयासाठी 252 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान भारताने 6 गडी गमवून पूर्ण केलं. 12 वर्षानंतर टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरलं आहे.
मोक्याच्या क्षणी हार्दिक पांड्या बाद झाल्याने पुन्हा एकदा धाकधूक वाढली आहे. कारण भारताला विजयासाठी 15 चेंडूत 11 धावांची गरज आहे.
टीम इंडिया तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याच्या उंबरठ्यावर आहे. मधल्या फळीत विराट कोहली आणि रोहित शर्माची विकेट पडल्यानंतर टेन्शन वाढलं होतं. पण श्रेयस अय्यरने सावध पण जबरदस्त खेळी केली. त्याला अक्षर पटेलची साथ लाभली.
टीम इंडियाच्या 40.5 ओव्हरनंतर 201 धावा झाल्या आहेत. टीम इंडियाला विजायसाठी आणखी 51 रन्सची गरज आहे. केएल राहुल आणि अक्षर पटेल ही जोडी खेळत आहे.
टीम इंडियाने चौथी विकेट गमावली आहे. श्रेयस अय्यर कॅच आऊट झाला आहे. श्रेयसने 48 धावा केल्या.
श्रेयस अय्यर-अक्षर पटेलन जोडी जमली आहे. टीम इंडियाने दमदार सुरुवातीनंतर झटपट 3 विकेट्स गमावले. त्यामुळे टीम इंडिया बॅकफुटवर गेली. मात्र त्यानंतर अक्षर पटेल आणि श्रेयस अय्यर या जोडीने डाव सावरला आहे. टीम इंडियाला आता 90 बॉलमध्ये 91 रन्सची गरज आहे.
टीम इंडियाला मोठा झटका लागला आहे. कर्णधार रोहित शर्मा आऊट झाला आहे. रचीन रवींद्र याने आपल्या बॉलिंगवर रोहितला 76 रन्सवर आऊट केलं. रोहित स्टंपिंग आऊट झाला. न्यूझीलंडने यासह कमबॅक केलं आहे. टीम इंडियाने यासह 17 धावांच्या मोबदल्यात 3 विकेट्स गमावल्या.
टीम इंडियाने दुसरी आणि मोठी विकेट गमावली आहे. विराट कोहली 1 धावेवर एलबीडबल्यू आऊट झाला आहे. मायकल ब्रेसवेल याने विराटला आऊट केलं.
टीम इंडियाने पहिली विकेट गमावली आहे. ग्लेन फिलिप्स याने अप्रतिम कॅच घेत शुबमन गिल याला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. गिलने 50 बॉलमध्ये 31 रन्स केल्या.
कर्णधार रोहित शर्मा आणि उपकर्णधार शुबमन गिल सलामी जोडीने टीम इंडियाला 252 धावांचा पाठलाग करताना अप्रतिम सुरुवात करुन दिली आहे. रोहित-शुबमन जोडीने शतकी सलामी भागीदारी केली आहे. रोहितने या भागीदारीत सर्वाधिक योगदान देत अर्धशतक झळकावलं.
कर्णधार रोहित शर्मा याने महाअंतिम सामन्यात अर्धशतकी खेळी केली आहे. रोहितच्या एकदिवसीय कारकीर्दीतील हे 58 वं अर्धशतक ठरलंय.
टीम इंडियाच्या 50 धावा पूर्ण झाल्या आहेत. रोहित शर्मा याने आठव्या ओव्हरमधील दुसऱ्या बॉलवर सिक्स ठोकला. यासह रोहित-शुबमन या सलामी जोडीची अर्धशतकी भागीदारी पूर्ण झाली.
कर्णधार रोहित शर्मा आणि उपकर्णधार शुबमन गिल या सलामी जोडीने टीम इंडियाला आश्वासक सुरुवात करुन दिली आहे. टीम इंडियाने 6 षटकांमध्ये 39 धावा केल्या आहेत. रोहित 28 आणि शुबमन 6 धावांवर नाबाद खेळत आहेत.
न्यूझीलंडने विजयासाठी दिलेलं 252 धावांचं आव्हान गाठण्यासाठी रोहित शर्मा आणि शुबमन गिल ही जोडी मैदानात उतरली आहे.
न्यूझीलंडने 50 षटकं पूर्ण खेळत 7 गडी गमवून 251 धावा केल्या आणि विजयासाठी 252 धावांचं आव्हान दिलं. आता हे आव्हान भारतीय संघ कसं गाठतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसं पाहिलं तर या मैदानावर ही धावसंख्या खूप आहे. त्यामुळे आघाडीच्या फलंदाजांना सावध पण चांगली खेळी करण्याची गरज आहे. न्यूझीलंडकडून डेरिल मिचेल आणि मिचेल ब्रेसवेल यांनी अर्धशतकी खेळी केली. तर भारताकडून कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. तर मोहम्मद शमी आणि रवींद्र जडेजाला प्रत्येकी एक विकेट मिळाली. फिरकी गोलंदाजांनी 38 षटकं टाकली आली 5 विकेट घेत 144 धावा दिल्या. तर वेगवान गोलंदाजांनी 12 षटकं टाकली आणि 104 धावा देत एकच गडी बाद केला. त्यामुळे वेगवान गोलंदाज या सामन्यात प्रभावी ठरले नाहीत.
न्यूझीलंडला मिचेल सँटनरच्या रुपाने सातवा धक्का बसला आहे. विराट कोहलीने जबरदस्त थ्रो करत त्याची विकेट काढली.
मोहम्मद शमी याने निर्णायक क्षणी डॅरेल मिचेल याला आऊट करत न्यूझीलंडला सहावा झटका दिला आहे. शमीने यासह वैयक्तिक पहिली विकेट मिळवली आहे. डॅरेल मिचेल याने 63 धावा केल्या.
न्यूझीलंडने 45 ओव्हरनंतर 5 विकेट्स गमावून 201 धावा केल्या आहेत. मायकल ब्रेसवेल 24 आणि डॅरेल मिचेल 53 धावांवर खेळत आहेत. टीम इंडियाचे गोलंदाज न्यूझीलंडला शेवटच्या 5 ओव्हरमध्ये किती धावा करुन देतात? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.
न्यूझीलंडने पाचवी विकेट गमावली आहे. वरुण चक्रवर्ती याने ग्लेन फिलिप्स याला बोल्ड आऊट केलंय. फिलिप्सने 52 बॉलमध्ये 34 रन्स केल्या.
डॅरेल मिचेल-ग्लेन फिलिप्स ही जोडी जमली आहे. डॅरेल मिचेल एक बाजू भक्कमपणे लावून आहे. तर ग्लेनकडून त्याला चांगली साथ मिळत आहे. त्यामुळे ही जोडी टीम इंडियाला डोकेदुखी ठरण्याआधी फोडणं गरजेचं आहे.
रवींद्र जडेजा याने टॉम लॅथम याला एलबीडबल्यू आऊट करत न्यूझीलंडला चौथा झटका दिला आहे. टॉमने 30 बॉलमध्ये 14 रन्स केल्या. रवींद्र जडेजाची ही पहिली विकेट ठरली.
न्यूझीलंडने 3 विकेट गमावल्यानंतर डॅरेल मिचेल आणि टॉम लॅथन ही जोडी सेट झाली आहे. त्यामुळे टीम इंडिया ही जोडून न्यूझीलंडला चौथा झटका देण्याच्या प्रयत्नात आहे.
कुलदीप यादव याने केन विलियमसनला आऊट करत न्यूझीलंडला तिसरा झटका दिला आहे. कुलदीपने केनला आपल्या बॉलिंगवर कॅच आऊट केलं. केलनने 14 बॉलमध्ये 11 रन्स केल्या. कुलदीपने त्याआधी आपल्या पहिल्याच ओव्हरमधील पहिल्या बॉलवर रचीन रवींद्रला बोल्ड केलं होतं.
कुलदीप यादवने त्याच्या कोट्यातील पहिल्याच आणि न्यूझीलंडच्या डावातील 11 व्या ओव्हरमधील पहिल्याच बॉलवर विकेट घेतली आहे. कुलदीपने सेट झालेल्या रचीन रवींद्र याला बोल्ड केलं. रचीनने 29 बॉलमध्ये 37 रन्स केल्या.
विल यंगच्या रुपाने भारताला पहिलं यश मिळालं आहे. विल यंग १५ धावांवर असताना वरुण चक्रवर्तीने त्याला पायचीत केलं.
रचिन रवींद्रला दोनदा जीवदान मिळालं. त्यामुळे भारताचं टेन्शन वाढलं. रचिन रवींद्रची आक्रमक खेळी सुरुच आहे.
पॉवर प्लेमध्ये रचिन रविंद्र आणि विल यंगने भारताचं टेन्शन वाढवलं आहे. बिनबाद ४६ धावा केल्या. त्यामुळे ही जोडी फोडण्याचं मोठं आव्हान आहे.
रचिन रवींद्रचा आक्रमक पवित्रा पाहायला मिळत आहे. हार्दिक पांड्याच्या एकाच षटकात १६ धावा ठोकल्या. यात दोन चौकार आणि एक षटकार मारला.
न्यूझीलंडच्या आघाडीच्या जोडीने सावध सुरुवात केली आहे. तीन षटकात बिन बाद १० धावा केल्या आहेत.
न्यूझीलंडकडून विल यंग आणि रचिन रवींद्र ही जोडी मैदानात उतरली आहे. ही जोडी फोडण्याचं मोठं आव्हान भारतीय गोलंदाजांसमोर आहे.
आम्ही इथे बरेचदा आलो आहोत, प्रथम फलंदाजी केली आणि प्रथम गोलंदाजी केली, दुसऱ्यांदा फलंदाजी करायला हरकत नाही. त्यात फारसा बदल झालेला नाही, आम्ही पाठलाग केला आणि जिंकलोही. त्यामुळे तुम्हाला खूप आत्मविश्वास मिळतो, नाणेफेक खेळापासून दूर जाते. दिवसाच्या शेवटी, तुम्हाला किती चांगले खेळला आहे हे महत्त्वाचे आहे. ड्रेसिंग रूममध्ये आम्ही टॉसची काळजी करू नये आणि फक्त चांगले खेळावे याबद्दल बोललो होतो, तेच आम्ही केले आहे आणि आज आम्हालाही करायचे आहे., असं रोहित शर्मा म्हणाला.
न्यूझीलंड (प्लेइंग इलेव्हन): विल यंग, रचिन रवींद्र, केन विल्यमसन, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिशेल सँटनर (कर्णधार), काइल जेमिसन, विल्यम ओरोर्क, नॅथन स्मिथ.
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती
न्यूझीलंडने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील महाअंतिम सामन्यात टॉस जिंकला आहे. न्यूझीलंडने बॅटिंगचा निर्णय घेतला आहे.
टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि उपकर्णधार शुबमन गिल या दोघांनी टॉसच्या काही मिनिटांपूर्वी खेळपट्टीची पाहणी केली आहे.
भारत विरुद्ध न्यूझीलंड अंतिम सामन्यासाठी क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. सामन्याकडे साऱ्या क्रिकेट विश्वाचं लक्ष लागून आहे. सामना सुरु होण्यासाठी अवघे काही मिनिटं बाकी आहेत. तर टॉस काही मिनिटांतच होणार आहे. टॉस कोण जिंकणार? याकडे साऱ्या क्रिकेट विश्वाचं लक्ष लागून आहे.
टीम इंडिया निरुद्ध न्यूझीलंड दोन्ही संघ याआधी 2000 साली चॅम्पियन्स ट्रॉफी अंतिम फेरीत आमनेसामने आले होते. तेव्हा न्यूझीलंडने टीम इंडियावर मात करत चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. त्यामुळे आता टीम इंडियाकडे यंदा अंतिम सामन्यात विजय मिळवून या पराभवाची परतफेड करण्याची संधी आहे.
न्यूझीलंड टीम : मिचेल सँटनर (कर्णधार), विल यंग, डेव्हॉन कॉनवे, केन विल्यमसन, रचिन रवींद्र, टॉम लॅथम (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मॅट हेन्री, काइल जेमिसन, विल्यम ओरुर्के, डॅरिल मिशेल, नॅथन स्मिथ, मार्क चॅपमन आणि जेकब डफी.
टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, ऋषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती आणि अर्शदीप सिंग
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील महाअंतिम सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 2 वाजता टॉस होईल.