IND vs NZ, 2nd Test, Day 3, LIVE Score : दिवसअखेर न्यूझीलंडची 5 बाद 140 धावांपर्यंत मजल, भारत विजायापासून पाच पावलं दूर

| Updated on: Dec 07, 2021 | 6:14 AM

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याचा आज तिसरा दिवस आहे. मुंबई कसोटी भारताच्या नियंत्रणात दिसत आहे. न्यूझीलंडच्या पहिल्या डावातील खराब फलंदाजीमुळे हा सामना आता भारताच्या हातात आहे.

IND vs NZ, 2nd Test, Day 3, LIVE Score : दिवसअखेर न्यूझीलंडची 5 बाद 140 धावांपर्यंत मजल, भारत विजायापासून पाच पावलं दूर
IND vs NZ

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याचा आज तिसरा दिवस आहे. मुंबई कसोटी भारताच्या नियंत्रणात दिसत आहे. न्यूझीलंडच्या पहिल्या डावातील खराब फलंदाजीमुळे हा सामना आता भारताच्या हातात आहे. पहिल्या डावात भारताने 325 धावांपर्यत मजल मारली होती. त्याच्या प्रत्युत्तरात खेळणारा न्यूझीलंडचा संघ 62 धावांत गारद झाला. त्यानंतर भारताने न्यूझीलंडला फॉलोऑन न देता दुसऱ्या डावात फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने दुसरा डाव 7 बाद 276 धावांवर घोषित केला आणि न्यूझीलंडला 540 धावांचं लक्ष्य दिलं. 540 धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडने दिवसअखेर 5 बाद 140 धावांपर्यंत मजल मारली आहे. विजयासाठी न्यूझीलंडला दोन दिवसात 400 धावांची आवश्यकता आहे. तर भारताला पाच विकेट्सची गरज आहे.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 05 Dec 2021 06:56 PM (IST)

    बाळासाहेब थोरात

    – जातीभेद,समाजातील दरी यावर संत साहित्यानं अनेक प्रहार केले – संतांचा आणी चळवळींच्या इतिहासातून स्वातंत्र्याची ज्योत पेटली – तत्कालीन साहित्यिकांमुळे, स्वातंत्र्यालढ्याला धार आली – एक बाई म्हणते स्वातंत्र्य ही भीक (कंगना) – महाराष्ट्रातील 1 वयोवृद्ध तिला पाठिंबा देतो (विक्रम गोखले) – हा स्वातंत्र्यवीरांचा अपमान – यावर एकही साहित्यिक बोलला नाही ही खंत – आणीबाणी बाबत माझे विचार वेगळे,तुमचे वेगळे –

  • 05 Dec 2021 06:10 PM (IST)

    अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ठरावांचे मुद्दे

    भारताच्या निरनिराळ्या ठिकाणी महाराष्ट्र परिचय केंद्र सुरू करून, याठिकाणी मराठी अधिकारीच नेमावे – बोली भाषांच्या संवर्धनासाठी समिती नेमावी – भारत सरकारच्या सर्व कार्यालयात ‘ळ’ या शब्दाचा वापर करण्याचे आदेश द्यावे – न्या.महादेव रानडे यांच्या निफाड येतील अपूर्ण स्मारक लवकर पूर्ण करावे – वामनदादा कर्डक, बाबुराव बागुल यांचे स्मारक करण्याचा ठराव – सयाजीराव गायकवाड यांच्या साहित्याला प्रकाशित करण्याचं काम बाबा भांड करत आहेत, त्यांचे अभिनंदन ठराव

    – कर्नाटक सरकारकडून मराठी भाषेची गळचेपी बंद करावी – कर्नाटकात मराठी भाषेचा वापर बंद करण्यात आला,त्याचा निषेध हा ठराव – बृहन्महाराष्ट्र साठी मराठी भाषा अधिकारी नेमावा हा ठराव

    – केंद्राकडे प्रलंबित असलेला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा हा प्रस्ताव मान्य करावा – मराठी भाषेच्या शाळा बंद करू नये यासाठी राज्य शासनाने प्रयत्न करावे – मराठी शाळांची मागणी करणाऱ्या संस्थाना शासनाने मान्यता द्यावी

    – पहिला ठराव श्रध्दांजलीचा – शंकर शरद,बीबी सावंत, राजीव सतव, सुंदर बहुगुणा, गणपत देशमुख,सतीश काळसेकर,लीला सत्यनारायण, बाबासाहेब पुरंदरे,दिलीप कुमार, विनायक पाटील यांना श्रद्धांजली – केंद्र,राज्य शासनाने बळीराजाला सर्वतोपरी मदत करावी असा ठराव – बळीराजाच्या पाठीशी साहित्यिक

  • 05 Dec 2021 05:26 PM (IST)

    दिवसअखेर न्यूझीलंडची 5 बाद 140 धावांपर्यंत मजल

    टॉम ब्लंडेल बाद झाल्यानंतर न्यूझीलंडचे फलंदाज हेन्री निकोल्स () आणि रचिन रवींद्र या दोघांनी आणखी पडझड होऊ दिली नाही. दोघांनी 8 षटकं खेळू काढली. त्यामुळे न्यूझीलंडने दिवसअखेर 5 बाद 140 धावांपर्यंत मजल मारली आहे. विजयासाठी न्यूझीलंडला दोन दिवसात 400 धावांची आवश्यकता आहे. तर भारताला पाच विकेट्सची गरज आहे.

  • 05 Dec 2021 04:59 PM (IST)

    न्यूझीलंडचा अर्धा संघ तंबूत, मिचेलपाठोपाठ टॉम ब्लंडेल माघारी

    न्यूझीलंडने 5 वी विकेट गमावली आहे. के. एस. भरतने टॉम ब्लंडेल (0) याला धावबाद केलं. (न्यूझीलंड 129/5)

  • 05 Dec 2021 04:56 PM (IST)

    भारताला चौथं यश, डॅरेल मिचेल 60 धावांवर बाद

    अक्षर पटेलने भारताला चौथी आणि महत्त्वाची विकेट मिळून दिली आहे. त्याने डॅरेल मिचेलला 60 धावांवर असताना जयंत यादवकरवी झेलबाद केलं. (न्यूझीलंड 128/4)

  • 05 Dec 2021 04:32 PM (IST)

    डॅरेल मिचेलचं अर्धशतक

    डॅरेल मिचेलने 76 चेंडू 51 धावा फटकावत आपलं अर्धशतक पूर्ण केलं आहे. 30 व्या षटकात उमेश यादवला सलग दोन चौकार लगावत त्याने हाफ सेंच्युरी साजरी केली. (न्यूझीलंड 109/3)

  • 05 Dec 2021 03:45 PM (IST)

    न्यूझीलंडला तिसरा धक्का, रॉस टेलर 6 धावांवर बाद

    न्यूझीलंडने तिसरी विकेट गमावली आहे. रवीचंद्नन अश्विनने रॉस टेलरला 6 धावांवर असताना चेतेश्वर पुजाराकरवी झेलबाद केल. (न्यूझीलंड 55/3)

  • 05 Dec 2021 03:30 PM (IST)

    न्यूझीलंडला दुसरा फलंदाज माघारी, विल यंग 20 धावांवर बाद

    भारताचा फिरकीपटू रवीचंद्नन अश्विनने भारताला अजून एक यश मिळवून दिलं आहे. त्याने सलामीवीर विल यंगला 20 धावांवर असताना झेलबाद केलं. (न्यूझीलंड 45/2)

  • 05 Dec 2021 02:53 PM (IST)

    न्यूझीलंडला पहिला धक्का, टॉम लॅथम 6 धावांवर बाद

    न्यूझीलंडने पहिली विकेट गमावली आहे. रवीचंद्नन अश्विनने टॉम लॅथमला 6 धावांवर असताना पायचित पकडलं. (न्यूझीलंड 13/1)

  • 05 Dec 2021 01:55 PM (IST)

    7 बाद 276 धावांवर भारताचा डाव घोषित, न्यूझीलंडला 540 धावांचं आव्हान

    भारताने 7 बाद 276 धावांवर डाव घोषित केला आहे. त्यामुळे न्यूझीलंडसमोर आता 540 धावांचं लक्ष्य आहे.

  • 05 Dec 2021 01:02 PM (IST)

    भारताला तिसरा झटका, शुभमन गिल 47 धावांवर बाद

    भारताने तिसरी विकेट गमावली आहे. रचिन रवींद्र याने शुभमन गिलला 47 धावांवर असताना टॉम लॅथमकरवी झेलबाद केलं. (भारत 197/3)

  • 05 Dec 2021 11:35 AM (IST)

    लंच ब्रेकपर्यंत भारताची 2 बाद 142 धावांपर्यंत मजल

    दोन्ही सलामीवीर बाद झाल्यानंतर शुभमन गिल आणि विराट कोहली मैदानात आले आहेत. लंचपर्यंत दोघांनी कोणतीही रिस्क न घेता काही षटकं खेळू काढली. लंच ब्रेकपर्यंत भारताने 2 बाद 142 धावांपर्यंत मजल मारली आहे. गिल 17 आणि कोहली 11 धावांवर खेळत आहेत.

  • 05 Dec 2021 10:56 AM (IST)

    भारताला दुसरा धक्का, चेतेश्वर पुजारा 47 धावांवर बाद

    भारताने दुसरी विकेट गमावली आहे. एजाज पटेलने चेतेश्वर पुजाराला रॉस टेलरकरवी झेलबाद केलं. पुजाराला त्याचं अर्धशतक पूर्ण करता आलं नाही. (भारत 115/2)

  • 05 Dec 2021 10:32 AM (IST)

    मयंक अग्रवाल बाद

    32 वे षटक घेऊन आलेल्या एजाज पटेलने मयंक अग्रवालला पव्हेलियनचा रस्ता दाखवला. एजाजच्या या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर मयंकने लाँग ऑफवर शॉट लगावला आणि विल यंगच्या हाती झेलबाद झाला. मयंक 108 चेंडूत 62 धावा करून माघारी परतला. आपल्या खेळीत त्याने नऊ चौकार आणि एक षटकार लगावला.

  • 05 Dec 2021 10:10 AM (IST)

    मयंकचं अर्धशतक

    एजाज पटेल 26 वे षटक घेऊन आला. ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर मयंकने एक्स्ट्रा कव्हरवर षटकार ठोकला आणि अर्धशतक पूर्ण केलं.

  • 05 Dec 2021 10:06 AM (IST)

    आजच्या दिवसाचं वेळापत्रक

Published On - Dec 05,2021 10:38 AM

Follow us
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.