IND vs NZ: ODI सीरीजमध्ये टीम इंडियाचा न्यूझीलंडवर मोठा विजय, पालघरच्या शार्दुलची जबरदस्त बॅटिंग

| Updated on: Sep 27, 2022 | 5:28 PM

IND vs NZ: संजूच्या कॅप्टनशिपखाली टीम इंडियाच्या युवा क्रिकेटर्सचा जबरदस्त खेळ

IND vs NZ: ODI सीरीजमध्ये टीम इंडियाचा न्यूझीलंडवर मोठा विजय, पालघरच्या शार्दुलची जबरदस्त बॅटिंग
shardul thakur
Image Credit source: AFP
Follow us on

मुंबई: सिनियर टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सीरीजची तयारी करतेय. त्याचवेळी इंडिया ए ने मोठ्या विजयाची नोंद केली आहे. तिसऱ्या वनडेमध्ये इंडिया ए ने न्यूझीलंड ए विरुद्ध दणदणीत विजय मिळवला. तब्बल 106 धावांनी इंडिया ए ने विजय मिळवला. या विजयासह तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत क्लीन स्वीप केल. यापूर्वीचे दोन्ही वनडे सामने इंडिया ए ने जिंकले आहेत. इंडिया ए टीममध्ये संधी मिळालेल्या सर्वच खेळाडूंनी दमदार प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला.

पालघरच्या शार्दुलची कमाल

कारण सिनियर टीम इंडियासाठी निवड करताना सिलेक्शन कमिटी इंडिया ए मधील कामगिरी विचारात घेणार आहे. आज तिसऱ्या वनडेमध्ये कॅप्टन संजू सॅमसन, तिलक वर्मा, शार्दुल ठाकूर आणि राज बावा यांनी चमकदार प्रदर्शन केलं.

पालघरच्या शार्दुल ठाकूरने आज बॉलने नाही पण बॅटने कमाल केली. पहिल्या वनडेमध्ये त्याने धारदार गोलंदाजी करुन चार विकेट घेतल्या होत्या.

संजूची दमदार बॅटिंग

आजच्या मॅचमध्ये प्रथम बॅटिंग करताना टीम इंडियाने 284 धावा फटकावल्या. अभिमन्यु ईश्वर (39) आणि राहुल त्रिपाठी (18) यांनी 55 धावांची चांगली सलामी दिली. कॅप्टन संजू सॅमसनने (54) धावांची अर्धशतकी खेळी केली.

मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या तिलक वर्मानेही (50) धावा केल्या. शार्दुल ठाकूच्या फटकेबाजीमुळे टीम इंडियाला 280 धावांचा टप्पा ओलांडता आला. त्याने 33 चेंडूत 51 धावा फटकावल्या. यात 4 चौकार आणि 3 षटकार होते.

न्यूझीलंडकडून फक्त डेन क्लेव्हरचा अपवाद

टीम इंडियाच्या 285 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडने चांगली सुरुवात केली होती. न्यूझीलंडच्या ओपनिंग जोडीने 52 धावांची सलामी दिली होती. पण चाड बोसची (20) पहिली विकेट गेल्यानंतर ठराविक अंतराने त्यांचे फलंदाज बाद झाले. फक्त डेन क्लेव्हरचा अपवाद ठरला. त्याने 9 चौकार आणि 2 षटकारांसह 83 धावा फटकावल्या.

राज बावाची गोलंदाजीत चमक

अन्य फलंदाज फक्त हजेरीवीर ठरेल. न्यूझीलंडचा डाव 178 धावात आटोपला. फलंदाजीत फ्लॉप ठरलेल्या राज बावाने गोलंदाजीत चमक दाखवली. त्याने 5.3 ओव्हर्समध्ये 11 धावा देऊन 4 विकेट काढल्या. कुलदीप यादव, चाहरने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.