AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

25 वर्षे जुना सुपरहिट चित्रपट, ज्यामुळे अनिल कपूरला मिळाली होती राजकारणात येण्याची ऑफर

बॉलिवूडमधील 25 वर्ष जुना चित्रपट, ज्या चित्रपटातील भूमिका इतकी गाजली की थेट अनिल कपूरला आली होती राजकारणात येण्याची ऑफर. आजही लोक त्या भूमिकेचे चाहते.

25 वर्षे जुना सुपरहिट चित्रपट, ज्यामुळे अनिल कपूरला मिळाली होती राजकारणात येण्याची ऑफर
Image Credit source: Social media
| Updated on: Feb 16, 2026 | 9:19 AM
Share

Anil Kapoor: बॉलिवूड अभिनेता अनिल कपूरने आपल्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. त्याने साकारलेल्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. आता तो लवकरच ‘सूबेदार’ या आगामी चित्रपटात झळकणार आहे. मात्र याचदरम्यान त्याने आपल्या 25 वर्षांपूर्वीच्या गाजलेल्या ‘नायक: द रियल हीरो’ या चित्रपटाबाबत एक मोठा खुलासा केला आहे.

2001 साली प्रदर्शित झालेल्या ‘नायक’ चित्रपटात अनिल कपूरने ‘शिवाजी राव’ ही भूमिका साकारली होती. एका न्यूज चॅनेलमध्ये कॅमेरामन म्हणून काम करणारा सामान्य तरुण एका दिवसासाठी मुख्यमंत्री बनतो आणि भ्रष्टाचाराविरोधात कठोर कारवाई करत सत्ताधाऱ्यांची पोलखोल करतो अशी या चित्रपटाची कथा होती. चित्रपटात दिवंगत अभिनेते अमरीश पुरी यांनी खलनायकाची भूमिका साकारली होती.

हा चित्रपट त्या काळात प्रचंड गाजला आणि आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अनिल कपूरने सांगितले की, ‘नायक’मधील त्याच्या दमदार भूमिकेनंतर त्याला प्रत्यक्ष राजकारणात येण्याचा प्रस्ताव मिळाला होता. काही राजकीय पक्षांकडून त्याला संपर्क करण्यात आला होता. मात्र त्याने सुरुवातीलाच तो प्रस्ताव नाकारला.

‘मी आजही विद्यार्थी आहे’ – अनिल कपूर

अनिल कपूरने सांगितले की, ‘मी स्वतःला नेहमी विद्यार्थी मानतो. अभिनेता म्हणून मला सतत शिकत राहायचे आहे.’ नायकसाठी त्याने कार्यशाळा आणि सराव केला होता. माहिम येथील त्याच्या कार्यालयात जाऊन त्याने भूमिका अधिक प्रभावी करण्यासाठी मेहनत घेतली. भविष्यात त्याच्यासोबत ‘नायक’पेक्षाही मोठ्या प्रकल्पात काम करण्याची इच्छा असल्याचेही त्याने व्यक्त केले.

90 च्या दशकात अनिल कपूर प्रचंड प्रसिद्ध होता. निर्माते त्याच्यावर विश्वास ठेवत आणि त्याच्या नावावर चित्रपट चालवत होते. ‘नायक’ने त्याच्या कारकिर्दीत वेगळे स्थान मिळवून दिले. सामान्य माणसाच्या भूमिकेतून त्याने सत्तेच्या व्यवस्थेवर थेट प्रहार करणारा नायक साकारला जो आजही लोकांच्या चर्चेत आहे.

आजही वयाच्या पुढच्या टप्प्यावर असतानाही अनिल कपूर तितक्याच जोमाने काम करत आहे. आगामी ‘सूबेदार’ चित्रपटातून तो पुन्हा एकदा दमदार भूमिकेत दिसणार असून त्याच्या चाहत्यांना त्याची नवी झलक पाहण्याची उत्सुकता आहे.

Follow Us
जोरदार पावसात टेम्पो वाहून गेला! मावळमध्ये थरारक घटना
Vadgaon | जोरदार पावसात टेम्पो वाहून गेला! मावळमध्ये थरारक घटना, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू
मुंबईकरांनो सावधान! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा इशारा! आजचा दिवस....
Devendra Fadnavis | मुंबईकरांनो सावधान! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा इशारा! आजचा दिवस....
आळंदीत धोक्याची घंटा! इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहतेय; वारकऱ्यांना....
Indrayani River | आळंदीत धोक्याची घंटा! इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहतेय; वारकऱ्यांना प्रशासनाचा तातडीचा इशारा
राज्यभरात थैमान घालणाऱ्या पावसाचा आमदार निवासाला मोठा फटका, थेट...
Mumbai Rain | राज्यभरात थैमान घालणाऱ्या पावसाचा आमदार निवासाला मोठा फटका, थेट...
मोठी बातमी! नदीने ओलांडली धोक्याची पातळी! 250 नागरिक... मुसळधार पावसात
मोठी बातमी! नदीने ओलांडली धोक्याची पातळी! 250 नागरिक... मुसळधार पावसाचा जोरदार तडाखा
तब्येत बिघडली...हॉस्पिटलमधूनच अ‍ॅक्शन मोडमध्ये शिंदे
Eknath Shinde | तब्येत बिघडली... पण काम थांबलं नाही! हॉस्पिटलमधूनच अ‍ॅक्शन मोडमध्ये शिंदे; महाड-रायगड पूरस्थितीवर दिले तातडीचे आदेश
नालासोपारा जलमय! रेल्वे ट्रॅक पाण्याखाली; हजारो प्रवाशांचे हाल
Nalasopara Track Water Logging | नालासोपारा जलमय! रेल्वे ट्रॅक पाण्याखाली; हजारो प्रवाशांचे हाल
राज्यात मुसळधार पावसामुळे आणखी एका ठिकणी दरड कोसळली; भयावह दृश्य समोर
Urse Toll Plaza Video | राज्यात मुसळधार पावसामुळे आणखी एका ठिकणी दरड कोसळली; भयावह दृश्य समोर
रेल्वे प्रशासनाचा तातडीचा निर्णय; डेक्कन क्वीन, इंद्रायणीसह अनेक गाड्य
मुंबई-पुणे प्रवाशांसाठी मोठी बातमी! रेल्वे प्रशासनाचा तातडीचा निर्णय; डेक्कन क्वीन, इंद्रायणीसह अनेक गाड्या...
भलंमोठं लोखंडी होर्डींग कोसळलं अन्... धो-धो पावसादरम्यान मोठी दुर्घटना
Thane | भलंमोठं लोखंडी होर्डींग कोसळलं अन्... धो-धो पावसादरम्यान मोठी दुर्घटना