IND vs PAK Playing 11: जाडेजाच्या जागेसाठी दोघांमध्ये स्पर्धा, जाणून घ्या कशी असेल प्लेइंग XI

IND vs PAK Playing 11: आशिया कप स्पर्धेत आज दुसऱ्यांदा भारत-पाकिस्तान मध्ये महामुकाबला रंगणार आहे. मागच्या रविवारी झालेल्या ग्रुप स्टेजच्या सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवला होता.

IND vs PAK Playing 11: जाडेजाच्या जागेसाठी दोघांमध्ये स्पर्धा, जाणून घ्या कशी असेल प्लेइंग XI
ind vs pak
Image Credit source: twitter
| Updated on: Sep 04, 2022 | 6:08 PM

मुंबई: आशिया कप स्पर्धेत आज दुसऱ्यांदा भारत-पाकिस्तान मध्ये महामुकाबला रंगणार आहे. मागच्या रविवारी झालेल्या ग्रुप स्टेजच्या सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवला होता. आज भारतीय संघ पुन्हा एकदा पाकिस्तानला धूळ चारण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. यावेळी टीम इंडिया वेगळ्या प्लेइंग इलेव्हनसह मैदानात उतरेल. कारण दुखापतीमुळे टीमने मोठ्या ऑलराऊंडर खेळाडूला गमावलं आहे. गुडघे दुखापतीमुळे रवींद्र जाडेजा आशिया कप मध्ये खेळत नाहीय. आता टीमची प्लेइंग इलेव्हन कशी असेल याची उत्सुक्ता आहे.

अक्षर पटेल की दीपक चाहर?

ऋषभ पंतला पाकिस्तान विरुद्ध मागच्या सामन्यात संधी मिळाली नव्हती. यावेळी सुद्धा पंतला संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. टीम पुन्हा एकदा दिनेश कार्तिकवरच विश्वास दाखवेल. रोहित-द्रविड जोडी पाच गोलंदाजांच्या स्ट्रॅटजीसह मैदानात उतरेल. त्यामुळे कार्तिक आणि पंतच एकत्र खेळणं कठीण आहे. रवींद्र जाडेजाच्या जागी टीम इंडिया अक्षर पटेल किंवा दीपक हुड्डाला संधी देऊ शकते. टीम मध्ये हार्दिक शिवाय आणखी एका ऑलराऊंडरची आवश्यकता आहे. दोघांपैकी प्लेइंग 11 मध्ये कोणाला संधी मिळणार? हे अजून निश्चित नाहीय. पाकिस्तानच्या संघात प्लेइंग इलेव्हन मध्ये बदल होण्याची शक्यता कमी आहे. हाँगकाँग विरुद्ध पाकिस्तानने 155 धावांनी विजय मिळवला होता. त्यामुळे भारताविरुद्ध पाकिस्तान तोच संघ उतरवेल, अशी दाट शक्यता आहे.

संभाव्य प्लेइंग इलेव्हन

भारत – रोहित शर्मा,(कॅप्टन) केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल/दीपक हुड्डा, दिनेश कार्तिक, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह, अवेश खान, युजवेंद्र चहल