
भारत आणि पाकिस्तान हायव्होल्टेज सामन्यात दोन्ही देशाचे खेळाडू आक्रमक पवित्रा घेऊनच उतरतात. तसेच मैदानात प्रेक्षकांचीही तशीच मिळत आहे. दोन्ही बाजूने खेळाडूंना डिवचण्याचा प्रयत्न होत आहे. नाणेफेकीचा कौल पाकिस्तानच्या बाजूने लागला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या 10 षटकात पाकिस्तानने सावध खेळी केली. पण त्यानंतर मोहम्मद रिझवान आणि सउद शकील यांनी खूपच संथ खेळी केली. या दरम्यान मोहम्मद रिझवान आणि हार्षित राणा यांच्यात काहीतरी झाल्याचं चित्र दिसलं. धाव घेताना मोहम्मद रिझवानने हार्षित राणाला धक्का मारला. कर्णधार रोहित शर्माने भारताचं 21 वं षटक टाकण्यासाठी हार्षित राणाकडे सोपवलं. या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर फटका मारला आणि धाव घेतली. यावेळी हार्षित राणाचं लक्ष हे चेंडूकडे होतं. मोहम्मद रिझवानने यावेळी हार्षित राणाला खांद्याने धक्का मारला.
मोहम्मद रिझवान आणि हार्षित राणा यांच्यात वाद होणार असं वाटत होतं. कारण मोहम्मद रिझवान आरामात बाजूने धावत जाऊ शकला असता. पण त्याने तसं काही केलं नाही. धक्का मारल्याचं पाहून हार्षित राणा वैतागला. त्याने मागे वळून पाहिलं आणि रिझवानला रागाने काहीतरी बोलला. पण त्याचे हावभाव तितके आक्रमक नव्हते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Harshit rana and Mohammad Rizwan shoulder to shoulder…. its heating in dubai🥵🥵#INDvsPAK #ChampionsTrophy pic.twitter.com/N9kucdOJwF
— Rahul Karki (@Rahulkarki417) February 23, 2025
Kalesh b/w Harshit Rana and Rizwan: pic.twitter.com/DEs1wkiIyp
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) February 23, 2025
दरम्यान, तिसऱ्या विकेटसाठी मोहम्मद रिझवान आणि सउद शकील यांनी 104 धावांची भागीदारी केली. पण मोहम्मद रिझवानने संथ गतीने फलंदाज केली. त्याने 77 चेंडूत 3 चौकाराच्या मदतीने 46 धावा केल्या. त्याचं अर्धशतकं अवघ्या 4 धावांनी हुकलं. खरं तर त्याला जीवदान मिळालं होतं. हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर हार्षित राणाने झेल सोडला होता. त्यामुळे मोठी खेळी करण्याची संधी होती. पण अक्षर पटेलने त्याला क्लिन बोल्ड करत बाहेर केलं.