
मेलबर्न: टीम इंडिया आणि पाकिस्तानमध्ये (IND vs PAK) आज मेलबर्नच्या (Melbourne) मैदानात महामुकाबला रंगणार आहे. टीम इंडिया (Team India) या मॅचसाठी कुठल्या 11 प्लेयर्सना संधी देणार? त्याची बऱ्याच दिवसांपासून चर्चा आहे. पाकिस्तान विरुद्धची ही मॅच टुर्नामेंटमधील सर्वात महत्त्वाची आहे, याची टीम मॅनेजमेंटला कल्पना आहे. टीम इंडिया या मॅचमध्ये कुठली प्लेइंग 11 उतरवणार? त्याबद्दल बरेच तर्क-वितर्क लढवले जात आहेत.
दोघांमध्ये कोणाला संधी?
पाकिस्तान विरुद्ध कुठली प्लेइंग 11 उतरवायची, ते आधीच ठरलं आहे, असं विधान कॅप्टन रोहित शर्माने टी 20 वर्ल्ड कपच्या वॉर्मअप मॅचआधी केलं होतं. भारताची फलंदाजीची क्रमवारी जवळपास सेट आहे. फक्त प्रश्न दिनेश कार्तिक आणि ऋषभ पंतचा आहे. दोन्ही विकेटकीपर फलंदाजांमध्ये कार्तिकची बाजू वरचढ आहे.
चहलचा दावा भक्कम
युजवेंद्र चहल आणि रविचंद्रन अश्विन या दोघांपैकी कोणाला संधी मिळणार? हा टीम इंडियासमोरचा दुसरा प्रश्न आहे. दोन स्पिनर आणि तीन वेगवान गोलंदाजांसह टीम इंडिया उतरणार हे निश्चित आहे. अक्षर पटेलच टीममधील स्थान जवळपास निश्चित आहे. अशा परिस्थिती एका स्पिनरला टीममध्ये संधी मिळू शकेत. यात चहलला संधी मिळण्याची शक्यता जास्त आहे. चहल विकेटटेकर आहे, तर अश्विन जास्त धावा देत नाही.
शमीला संधी मिळू शकते
वेगवान गोलंदाजांबद्दल बोलायच झाल्यास, अर्शदीप सिंह, भुवनेश्वर कुमारसह मोहम्मद शमीला संधी मिळू शकते. वॉर्मअप मॅचच्या एकाच मॅचमध्ये शमीने कमाल केली होती. शमीला जसप्रीत बुमराहच्या जागी टीममध्ये स्थान मिळालं आहे. हार्दिक पंड्या चौथा गोलंदाज असेल. हर्षल पटेलला संधी मिळण्याची शक्यता कमी आहे.
भारताची संभाव्य प्लेइंग XI- रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह
पाकिस्तानची संभाव्य प्लेइंग इलेव्हन – बाबर आजम (कॅप्टन), मोहम्मद रिजवान, शाम मसूद, शादाब खान, मोहम्मद नवाज, हैदर अली, इफ्तिखार अहमद, आसिफ अली, नसीम शाह, हॅरिस रौफ आणि शाहीन शाह आफ्रिदी