
टीम इंडियाने आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत आयर्लंडला पराभूत करत विजयी सुरुवात केली. टीम इंडियाने आयर्लंडवर 8 विकेट्सने विजय मिळवला. टीम इंडियाने विजयासाठी मिळालेलं 97 धावांचं आव्हान 2 विकेटस गमावून पूर्ण केलं. टीम इंडियाकडून कॅप्टन रोहित शर्मा याने 52 धावा केल्या. ऋषभ पंतने नाबाद 36 धावांची खेळी केली. तर त्याआधी उपकर्णधार हार्दिक पंड्या याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. आता टीम इंडियाचा वर्ल्ड कप मोहिमेतील दुसरा सामना हा पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. हा सामना रविवारी 9 जून रोजी होणार आहे. या सामन्याआधी उपकर्णधार हार्दिक पंड्याने रणशिंग फुकलं आहे. हार्दिकने पाकड्यांची शिकार करणार असल्याचं म्हटलं आहे.
आयर्लंडला पराभूत केल्यानंतर टीम इंडिया आता दुसऱ्या विजयासाठी सज्ज आहे. टीम इंडियाचं संपूर्ण लक्ष हे आता पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याकडे आहे. टीम इंडियाचा हा दुसरा सामना न्यूयॉर्कमध्ये होणार आहे. त्यामुळे टीम इंडियाचा पाकिस्तान विरुद्धही आयर्लंडप्रमाणे विजय मिळवण्याचा प्रयत्न असणार आहे. या सामन्याआधी हार्दिकने पाकिस्तानला सावध राहण्याचा इशाराच एका प्रकारे दिला आहे. बीसीसीआयने सोशल मीडियावर एक व्हीडिओ पोस्ट केला आहे. हार्दिकने या व्हीडिओत टीम इंडियाचे खेळाडू चांगली कामगिरी करतील अशी आशा व्यक्त केली. तसेच सर्वांचंच मैदानात जात शिकार करणं हे एकच लक्ष्य असेल, असं हार्दिकने म्हटलं.
The feeling of starting on a winning note 😃
Backing his skill-sets and potential 👌
Being part of an experienced bowling lineup 👏
Post-win chat with #TeamIndia vice-captain Hardik Pandya 👌👌 – By @RajalArora
WATCH 🎥🔽 #T20WorldCup | #INDvIRE | @hardikpandya7
— BCCI (@BCCI) June 6, 2024
टी 20 वर्ल्ड कपसाठी पाकिस्तान टीम : बाबर आजम (कप्तान), अबरार अहमद, आजम खान, फखर जमान, हारिस रऊफ, इफ्तिखार अहमद, इमाद वसीम, मोहम्मद अब्बास अफ्रिदी, मोहम्मद आमिर, मोहम्मद रिजवान, नसीम शाह, सईम अयूब, शादाब खान, शाहीन शाह अफरीदी आणि उस्मान खान.
टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल , अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.