AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ind vs Sa 1st Test : टीम इंडियाचा आफ्रिकेने काढला घाम, तिसऱ्या दिवशी 163 धावांची आघाडी

ind vs sa test match : टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या सामन्यात कसोटी सामन्यावर आफ्रिकेने आपली पकड आणखी मजबूत केली आहे.

Ind vs Sa 1st Test : टीम इंडियाचा आफ्रिकेने काढला घाम, तिसऱ्या दिवशी 163 धावांची आघाडी
ind vs sa test
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Dec 28, 2023 | 5:58 PM
Share

मुंबई : टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या कसोटी सामन्यात आफ्रिकेचा पहिला डाव 408-9 धावांवर संपला आहे. साऊथ आफ्रिकेकडे आता 163 धावांची आघाडी आहे. टीम इंडियाकडून जसप्रीत बुमराहने 4 विकेट घेतल्या आहेत. आता टीम इंडियाल बॅकफटूवर गेली असून फलंदाजांची मोठी कसोटी असणार आहे. आफ्रिका संघाने घेतलेली आघाडी तोडत विजयासाठी मोठं लक्ष द्यावं लागणार आहे.

दोन दिवसांचा खेळ संपल्यावर आज तिसऱ्या दिवशी डीन एल्गर आणि  मार्को जॅन्सन नाबाद होते. आज डावाला सुरूवात केल्यावर कोणत्याच बॉलरला विकेट मिळाली नाही. सिराज, बुमराह आणि प्रसिद्ध कृष्णा यांचा मारा सपशेल अपयशी ठरत होता.  परत एकदा शार्दुल ठाकूर याने आपली जादू दाखवत कसोटीच्या पहिल्या दिवसापासून खेळपट्टीवर टिकून असलेल्या डीन एल्गर याला माघारी पाठवलं. डीन एल्गरने 287 चेंडूत 185  धावा केल्या यामध्ये त्याने 28 चौकार मारले.

डीन एल्गर आऊट झाल्यावर जेराल्ड कोएत्झी आणि मार्को जॅन्सन यांनी चांगली भागीदारी केली होती. टीम इंडियाच्या बॉलर्सला दोघांनीही अडकवून ठेवलं होतं. कोएत्झी याला अश्विनने आऊट केल्यावर बाकी राहिलेलं काम जसप्रीत बुमराहने केलं. कागिसो रबाडा आणि नांद्रे बर्गर यांना बोल्ड करत आफ्रिकेला ऑल आऊट केलं. आफ्रिकेच्या नऊ विकेट गेल्या होत्या मात्र कॅप्टन टेम्बा बावुमा जखमी झाल्याने तो कसोटीत खेळत नाहीये.

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा

दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): डीन एल्गर, एडन मार्करम, टोनी डी झोर्झी, टेम्बा बावुमा (कर्णधार), कीगन पीटरसन, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल वेरेन (विकेटकीपर), मार्को जॅन्सन, जेराल्ड कोएत्झी, कागिसो रबाडा, नांद्रे बर्गर

Follow Us
उदय सामंत: 'एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य'
उदय सामंत: एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य
मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे
'मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे', रिक्षाचालकांच्या मराठी सक्तीवरून शिंदेंची प्रतिक्रिया
मराठी न बोलल्यास परवाना रद्द करण्याच्या धमक्यांवरचा दुबेंचा इशारा
संजय दुबे यांचा प्रताप सरनाईक यांच्या मराठी भाषेच्या सक्तीला थेट विरोध
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल:
शरद पवार एनडीएमध्ये जाणार नाहीत, विरोधातच राहणार
पवारांकडून एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चा फेटाळल्या; पक्ष कार्यकर्त्यांना दिले स्पष्ट निर्देश
देशमुखांचं कारागृह महानिरीक्षकांना पत्र; गैरप्रकारांच्या चौकशीची मागणी
धनंजय देशमुखांचे बीड कारागृह महानिरीक्षकांना पत्र: गैरप्रकार चौकशी आणि आरोपी स्थलांतराची मागणी
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर? ठाण्यातील कार्यक्रमात भाजप नेत्यांची अनुपस्थिती
बेस्ट कामगारांचा बेमुदत संप; प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
बेस्ट कामगारांचा मंगळवारपासून बेमुदत संप: प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
पालकमंत्री महाजनांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना मदत
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना अवयव प्रत्यारोपणासाठी मदत