AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

sa vs ind 1st test | दुसऱ्या दिवशी आफ्रिकेची सामन्यावर पकड, शेवटच्या सेशनमध्ये टीम इंडियाचं कमबॅक

SA vs IND : टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिकेमधील पहिल्या कसोटी सामन्यामध्ये दुसऱ्या दिवशी आफ्रिका संघाने पकड मिळवली आहे. आफ्रिकेच्य एल्गर याने चिवट फलंदाजी करत शेवटपर्यंत मैदान सोडलं नाही.

sa vs ind 1st test | दुसऱ्या दिवशी आफ्रिकेची सामन्यावर पकड, शेवटच्या सेशनमध्ये टीम इंडियाचं कमबॅक
avesh khan replace mohammed shami for second test
| Updated on: Dec 27, 2023 | 11:46 PM
Share

मुंबई :  टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवशी आफ्रिका संघाने आपली पकड मिळवली आहे. 208-8 धावांवरून पुढे खेळताना टीम इंडियाचा डाव 245 धावांवर आटोपला. के.एल. राहुल याच्या शतकी खेळीने एक सन्मानजक धावसंख्याटीम इंडियाला उभारता आली. आफ्रिका संघाने पहिल्या डावात बॅटींग करताना दुसऱ्या दिवशी 256-5 धावा केल्या. कमी प्रकाशामुळे सामना थांबवण्यात आला. आफ्रिका संघाकडे आता 11 धावांची आघाडी आहे. आफ्रिका संघाकडून डीन एल्गर याने नाबाद 140 धावा तर , मार्को जॅन्सन नाबाद 3 धावांवर खेळत आहे.

आफ्रिकेची बॅटींग

आफ्रिका संघ बॅटींगला उतरल्यावर अवघ्या 11 धावांवर मोहम्मद सिराज याने एडन मार्करम याला 5 धावांवर आऊट करत पहिला धक्का दिला. त्यानंतर टोनी डी झोर्झी आणि डीन एल्गर यांनी डावाची सूत्र आपल्या हातात घेतली. टीम इंडियाच्या गोलंदाजांना विकेट मिळू दिली नाही. 93 धावांची भागीदारी झाली असताना जसप्रीत बुमराह याने झोर्झी याला 28 धावांवर आऊट करत दुसरा धक्का दिला. त्यानंतर पीटरसनला २ धावांवर बोल्ड करत बुमराहनेच तिसरी विकेट मिळवून दिली. मात्र तरीही त्यानंतर चौथ्या विकेटसाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागली.

डीन एल्गर आणि डेव्हिड बेडिंगहॅम दोघांनी शतकी भागीदारी करत यश मिळवून दिली आहे. टीम इंडियाचे बॉलर हाराकिरीला आलेले दिसले. मोहम्मद सिराज याने पदार्पणवीर डेव्हिड बेडिंगहॅम याला 56 धावांवर बोल्ड केलं. त्यानंतर आलेल्या काइल वेरेन याला प्रसिद्ध कृष्णाने आऊट केलं. टीम इंडियाने शेवटच्या सेशनमध्ये कमबॅक केलं. आता उद्या किती धावांवर रोखणार हे पाहावं लागणार आहे.

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा

दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): डीन एल्गर, एडन मार्करम, टोनी डी झोर्झी, टेम्बा बावुमा (कर्णधार), कीगन पीटरसन, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल वेरेन (विकेटकीपर), मार्को जॅन्सन, जेराल्ड कोएत्झी, कागिसो रबाडा, नांद्रे बर्गर

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.