AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA : टेम्बा बावुमा दोन मिनिटाची वेळ मागून मैदानातून धावत गेला बाहेर , जाताच अशी मागणी केली

गुवाहाटी कसोटी सामन्यातही टीम इंडियावर पराभवाची नामुष्की ओढावली आहे. इंग्लंड दौऱ्यात जे काही कमावलं ते सर्व या कसोटी मालिकेत गमावल्याचं दिसत आहे. पहिल्या डावात भारताचा खेळ फक्त 201 धावांवर आटोपला. दक्षिण अफ्रिकेने फॉलोऑन दिला नाही. पण एक विचित्र प्रकार मात्र पाहायला मिळाला.

IND vs SA : टेम्बा बावुमा दोन मिनिटाची वेळ मागून मैदानातून धावत गेला बाहेर , जाताच अशी मागणी केली
IND vs SA : टेम्बा बावुमा दोन मिनिटाची वेळ मागून मैदानातून धावत गेला बाहेर , जाताच अशी मागणी केलीImage Credit source: Proteas Men Twitter
| Updated on: Nov 24, 2025 | 4:32 PM
Share

IND vs SA : भारताने कोलकाता कसोटी सामना हातातून गमावला. आता गुवाहाटी कसोटीतही पराभवाची नामुष्की ओढावली आहे. त्यामुळे या कसोटी मालिकेत क्लिन स्विप मिळणार हे जवळपास निश्चित झालं आहे. कारण पहिल्या डावात दक्षिण अफ्रिकेने 489 धावा केल्या आणि भारताचा डावा 201 धावांवर आटोपला. त्यामुळे दक्षिण अफ्रिकेकडे 288 धावांची आघाडी आहे. खरं तर 200 धावांचा पुढे आघाडी असेल तर फॉलोऑन दिला जातो. पण असं असूनही टेम्बा बावुमाने तसं केलं नाही. त्यामुळे त्याच्या निर्णयाची चर्चा होत आहे. दक्षिण अफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमाने फॉलोऑन न देण्याचा निर्णय मैदानाबाहेर जाऊन केला. टीम इंडिया सर्वबाद झाल्यानंतर पंचांनी टेम्बा बावुमाला फॉलोऑनबाबत विचारलं. तेव्हा त्याने दोन मिनिटांचा वेळ मागितला आणि धावत मैदानाबाहेर गेला.

टेम्बा बावुमा धावत जाण्याचं कारण काय?

टेम्बा बावुमा खरं तर संभ्रमात होता, त्यामुळे फॉलोऑनबाबतचा निर्णय विचारण्यासाठी तो धावत टीम मॅनेजमेंटकडे गेला. यासाठी त्याने पंचांकडे दोन मिनिटांचा वेळ मागितला. वेळ मिळाताच थेट ड्रेसिंग रूममध्ये धावत गेला आणि पुन्हा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मैदानाच्या बाहेरूनच त्याने पंचांना आपल्या फलंदाजीचा निर्णय कळवला. बावुमाने मैदानाबाहेरूनच पंचांना माहिती दिली की, पिचवर हलका रोलर हवा आहे. , दोन दिवसांच्या खेळात खेळपट्टीवर यामुळे आणखी भेगा पडतील अशी रणनिती आहे. कारण दुसऱ्या डावात भारतीय संघ मैदानात फलंदाजीला उतरणार आहे. त्यामुळे दक्षिण अफ्रिकन गोलंदाजांना मदत होईल.

मार्को यानसेनने पहिल्या डावात कंबरडं मोडलं

मार्को यानसेनच्या भेदक माऱ्यापुढे भारतीय संघाची दाणादाण उडाली. त्याने फक्त 48 धावा देते 6 गडी बाद केले. जानसेनने ध्रुव जुरेल, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा आणि नितीश कुमार रेड्डी यांना बाद करून मधली फळी उद्ध्वस्त केली. इतकंच काय तर हार्मरने 3 आणि केशव महाराजने एक बळी घेतला. तिसर्‍या दिवसाचा खेळ संपला तेव्हा दक्षिण अफ्रिकेने बिनबाद 26 धावा केल्या आहे. दक्षिण अफ्रिकेकडे मजबूत 314 धावांची आघाडी आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...