AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA : गुवाहाटी कसोटीत टीम इंडिया पराभवाच्या उंबरठ्यावर, करूण नायरने पोस्ट चर्चेत

दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत क्लीन स्वीपचं सावट टीम इंडियावर ओढावलं आहे. दुसऱ्या कसोटीतही टीम इंडियाची निराशाजनक कामगिरी राहिली. त्यामुळे दुसऱ्या डावात पराभव जवळपास निश्चित असल्याचं दिसत आहे. असं असताना करूण नायरची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत आहे.

IND vs SA : गुवाहाटी कसोटीत टीम इंडिया पराभवाच्या उंबरठ्यावर, करूण नायरने पोस्ट चर्चेत
IND vs SA : गुवाहाटी कसोटीत टीम इंडिया पराभवाच्या उंबरठ्यावर, करूण नायरने पोस्ट चर्चेतImage Credit source: PTI
| Updated on: Nov 24, 2025 | 3:53 PM
Share

कोलकाता कसोटी सामना गमावल्यानंतर आता टीम इंडियावर गुवाहाटी कसोटी सामना गमवण्याची वेळही आली आहे. अष्टपैलू खेळाडूंचा भरणा असूनही टीम इंडियावर अशी वेळ ओढावली आहे. दक्षिण अफ्रिकेने पहिल्या डावात 489 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाचा डाव 201 धावांवर आटोपला. टीम इंडिया 288 धावांनी पिछाडीवर राहिली. त्यामुळे इतक्या मोठ्या आघाडीनंतर दक्षिण अफ्रिका त्यात विजयी धावांची भर घालत आहे. दुसऱ्या डावाचा खेळ सुरु होताच दक्षिण अफ्रिका 300च्या पुढे निघून गेली आहे. यात आणखी भर पडणार यात काही शंका नाही. त्यामुळे उर्वरित दोन दिवसात भारताच्या पराभवाची स्क्रिप्ट लिहिली गेल्याचं दिसत आहे. असं असताना भारतीय संघाची मधली फळी चिंतेचा विषय ठरली आहे. कर्णधार ऋषभ पंतही बेभरवशी फलंदाज आहे. चालला तर चालला नाही तर काहीच नाही. या दरम्यान, करूण नायरची क्रिप्टिक पोस्टने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे.

काय लिहिलं आहे करूण नायरने?

करूण नायरने एक पोस्ट लिहित शेअर केलं की, ‘ काही परिस्थिती तुम्हाला मनापासून माहित असतात आणि तिथे नसल्याची शांतता स्वतःची एक वेगळीच वेदना वाढवते .’ करूण नायरची ही क्रिप्टिक पोस्ट क्रीडारसिक भारतीय संघाच्या स्थितीशी जुळवत आहेत. करूण नायर गेल्या काही वर्षात देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत आहे. पण त्याला इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत संधी दिली. त्यानंतर त्याला संघातून डावलण्यात आलं आहे. आठ वर्षांनी त्याने भारतीय संघात कमबॅक केलं होतं. मात्र त्याच्यासाठी इंग्लंड दौरा काही खास ठरला नाही. त्यामुळे निवडकर्त्यांना डावलण्याचं निमित्त मिळालं.

दक्षिण अफ्रिकेविरुद्धची कसोटी गमवल्यास गौतम गंभीरची नाक कापल्यासारखंच होणार आहे. कारण त्याच्या प्रशिक्षणाखाली दुसऱ्यांदा टीम इंडियाला देशात झालेल्या कसोटी मालिकेत क्लिन स्विप मिळणार आहे. त्यातच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेचं गणितही चुकणार आहे. आता ऑस्ट्रेलियाविरुद्धची पाच सामन्यांच्या कसोटी मालिका 5-0 ने विजय मिळवणं तर कठीण आहे. त्यात न्यूझीलंड आणि श्रीलंका कसोटी मालिकाही कठीण जाणार हे निश्चित आहे. अशा स्थितीत भारताचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेचा अंतिम सामना खेळणं कठीण दिसत आहे.

मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.