
टीम इंडियाचा स्टार आणि अनुभवी फलंदाज रोहित शर्मा याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात दमदार अर्धशतक झळकावलं आहे. रोहितने विशाखापट्टणममध्ये विजयी धावांचा पाठलाग करताना ही खेळी केली आहे.दक्षिण आफ्रिकेने भारतासमोर 271 धावांचं आव्हान ठेवलंय. रोहित आणि यशस्वी जैस्वाल या जोडीने या धावांचा पाठलाग करताना भारताला चाबूक सुरुवात करुन दिली. या दरम्यान रोहितने अर्धशतक झळकावलं. रोहितने या खेळी दरम्यान ऐतिहासिक कामगिरी केली. रोहितने डावातील 20 व्या ओव्हरमधील तिसऱ्या बॉलवर 1 धाव घेत अर्धशतक झळकावलं. रोहितने या अर्धशतकात 54 चेंडूंचा सामना केला. रोहितने या खेळीत 1 षटकार आणि 6 चौकार लगावले. रोहितचं हे एकदिवसीय कारकीर्दीतील 61 वं तसेच या मालिकेतील एकूण दुसरं अर्धशतक ठरलं. तसेच रोहितचं वनडे करियरमधील विजयी धावांचा पाठलाग करतानाचं हे 14 वं अर्धशतक ठरलं.
रोहितने या खेळीदरम्यान केशव महाराज याने टाकलेल्या 14 व्या ओव्हरमधील चौथ्या बॉलवर 1 धाव घेताच इतिहास घडवला. रोहितने या सिंगलसह आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील 20 हजार धावांचा टप्पा पूर्ण केला. रोहित यासह अशी कामगिरी एकूण चौथा भारतीय फलंदाज ठरला. रोहितआधी टीम इंडियासाठी विराट कोहली, राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकर यांनी 20 हजारांपेक्षा अधिक धावा केल्या आहेत.
रोहित शर्मा याने या खेळीत एक खास कामगिरी केली. रोहितने मायदेशात 5 हजार एकदिवसीय धावा पूर्ण केल्या. बीसीसीआयने सोशल मीडियावरुन रोहितच्या अर्धशतकाचा व्हीडिओ पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे.
रोहितने अर्धशतकापर्यंत स्वत: बेछूट फटकेबाजी करण्यापासून रोखलं होतं. मात्र रोहितने अर्धशतकानंतर गिअर बदलला. रोहितने दे दणादण फटकेबाजी सुरु केली. मात्र याच फटकेबाजीने रोहितचा घात झाला. रोहित धावांच्या नादात आपली विकेट गमावून बसला.
रोहितची दमदार खेळी
In the zone 🔝
Rohit Sharma also completes 5000 ODI runs in India 🙌
Updates ▶️ https://t.co/HM6zm9o7bm#TeamIndia | #INDvSA | @IDFCFIRSTBank | @ImRo45 pic.twitter.com/ZsbpwV2Ih5
— BCCI (@BCCI) December 6, 2025
रोहितने 26 व्या ओव्हरमधील पाचव्या बॉलवर मोठा फटका मारला. मात्र रोहितचा अंदाच चुकला. त्यामुळ रोहित कॅच आऊट झाला. रोहितने 73 बॉलमध्ये 102.74 च्या स्ट्राईक रेटने 75 रन्स केल्या. रोहितने या खेळीत 3 सिक्स आणि 7 फोर लगावले. तसेच रोहित आऊट होताच दीडशतकी भागीदारीचा शेवट झाला. रोहित आणि यशस्वीने पहिल्या विकेटसाठी 155 बॉलमध्ये 155 रन्सची पार्टनरशीप केली.