IND vs SA: T 20 मॅच संदर्भात महत्त्वाची बातमी, अचानक सामन्याआधी BCCI कडून नियमात बदल

भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये (IND vs SA) पहिला T 20 सामना सुरु व्हायला, आता फक्त काही तासांचा अवधी उरला आहे. पाच टी 20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज होणार आहे.

IND vs SA: T 20 मॅच संदर्भात महत्त्वाची बातमी, अचानक सामन्याआधी BCCI कडून नियमात बदल
IND vs SA
Image Credit source: twitter
| Updated on: Jun 09, 2022 | 12:25 PM

मुंबई: भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये (IND vs SA) पहिला T 20 सामना सुरु व्हायला, आता फक्त काही तासांचा अवधी उरला आहे. पाच टी 20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज होणार आहे. दिल्ली मध्ये होणाऱ्या सामन्याआधी नियमांमध्ये काही बदल करण्यात आल्याची माहिती आहे. अंगाची लाही लाही करणारी गर्मी आणि दिल्लीतील तापमान लक्षात घेऊन BCCI ने नियमांमध्ये काही बदल केले आहेत. दिल्लीत जास्त तापमान आहे. जून महिन्यात राजधानी दिल्लीत तापमान जास्त असते. वाढत्या गर्मीचा मॅचवर होणारा परिणाम लक्षात घेऊन, बीसीसीआयने नियमांमध्ये थोडे बदल केले आहेत. दिल्लीमध्ये तापमान (Dehli Tempreture) सध्या 45 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त आहे. इतक्या गर्मीत मैदानावर उतरुन परफॉर्म करणं, खेळाडूंसाठी सोपं नसतं. दिल्लीच्या गर्मीमुळे काही अघटित घडू नये, यासाठी बीसीसीआयने नियमांमध्ये बदल केला आहे. पाकिस्तान आणि वेस्ट इंडिजमध्ये मुल्तान येथे सुरु असलेल्या वनडे सीरीजसाठी काही नियम बदलण्यात आले आहेत. हा बदल सुद्धा तसाच आहे. तिथे सामन्याची वेळ पुढे ढकलण्यात आली आहे. बीसीसीआयने केलेला बदल हा खेळाडूंच्या ड्रींक्स ब्रेकशी संदर्भात आहे.

का बदलला नियम?

अंगाची लाही लाही करणाऱ्या गर्मीपासून खेळाडूंना थोडा दिलासा देण्यासाठी बीसीसीआयने पहिल्या टी 20 सामन्यात 10 ओव्हर्सनंतर ड्रींक्स ब्रेकचा निर्णय घेतला आहे. भारतीय क्रिकेट बोर्डाचा हा निर्णय स्वागत योग्य आहे. नियमानुसार, आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान टी 20 च्या एका इनिंगमध्ये कुठलाही ब्रेक घेतला जात नाही. पण दिल्लीची गर्मी लक्षात घेऊन बीसीसीआयने नियम बदलला आहे.

सध्या तरी फक्त दिल्ली पुरताच्या सामन्यासाठी नियम

BCCI ने गर्मी लक्षात घेऊन आता जी भूमिका घेतली आहे, तशीच भूमिका 2021 मध्ये टी 20 वर्ल्ड कपच्या एका सामन्यादरम्यान ICC ने घेतली होती. पहिल्या 10 ओव्हर्सनंतर ड्रींक्स ब्रेक घेण्यात आला होता. सध्यातरी फक्त दिल्ली पुरताच्या सामन्यापर्यंत हा नियम मर्यादीत आहे. उर्वरित चार सामन्यांमध्ये हा नियम लागू होणार की नाही? या बद्दल स्पष्टत नाहीय.