AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA 1st T20i : टीम इंडिया-दक्षिण आफ्रिका ओपनिंग मॅच, सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

India vs South Africa 1st T20i Live Streaming : टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या टी 20i मॅचचा थरार कटकमध्ये रंगणार आहे. चाहत्यांना या सामन्याची प्रतिक्षा लागून राहिली आहे. जाणून ह्या सामना सुरु होण्याची वेळ.

IND vs SA 1st T20i : टीम इंडिया-दक्षिण आफ्रिका ओपनिंग मॅच, सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
IND vs SA 1st Odi Live StreramingImage Credit source: @ProteasMenCSA and Bcci
| Updated on: Dec 08, 2025 | 10:46 PM
Share

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी 20i मालिकेचं काउंटडाऊन सुरु झालं आहे. क्रिकेट चाहत्यांना टेस्ट आणि वनडे सीरिजनंतर उभयसंघातील टी 20i मालिकेचे वेध लागले आहेत. टीम इंडियाची कसोटी मालिकेत निराशाजनक कामगिरी राहिली. दक्षिण आफ्रिकेने भारताला 2-0 ने व्हाईटवॉश केलं. मात्र टीम इंडियाने एकदिवसीय मालिकेत पलटवार करत या पराभवाची परतफेड केली. भारताने एकदिवसीय मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. आता दोन्ही संघ नव्या कर्णधारांसह टी 20i मालिकेच्या थरारासाठी मैदानात उतरणार आहेत. मालिकेतील पहिला टी 20i सामना कधी आणि कुठे होणार? हे जाणून घेऊयात.

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला टी 20i सामना कधी?

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला टी 20i सामना मंगळवारी 9 डिसेंबरला होणार आहे.

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला टी 20i सामना कुठे?

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला टी 20i सामना ओडीशातील कटकमधील बाराबती स्टेडियम इथे आयोजित करण्यात आला आहे.

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिल्या टी 20i सामन्याला किती वाजता सुरुवात होईल?

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिल्या टी 20i सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होईल. तर 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस कोण जिंकणार? हे निश्चित होईल.

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला टी 20i सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळणार?

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला टी 20i सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर टीव्ही9 मराठी वेबसाईटच्या पुढील लिंकवर https://www.tv9marathi.com/sports/cricket-news सामन्याबाबतीत लाईव्ह अपडेट्स जाणून घेता येतील.

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला टी 20i सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळणार?

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला टी 20i सामना मोबाईलवर जिओहॉटस्टार एपद्वारे पाहायला मिळेल.

सूर्या पुन्हा एकदा नेतृत्वासाठी सज्ज

दरम्यान ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या मालिकेनंतर सूर्यकुमार यादव दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नेतृत्व करण्यासाठी सज्ज झाला आहे. तर एडन मार्रक्रम दक्षिण आफ्रिकेचं टी 20I मालिकेत नेतृत्व करणार आहे. एडनने टीम इंडिया विरुद्ध पहिल्या वनडेत टेम्बा बवुमा याच्या जागी नेतृत्व केलं होतं.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार