काय झाडी, काय डोंगर… गुवाहाटी राजकारण नव्हे अनपेक्षित घटनेनं पुन्हा चर्चेत

तुम्ही म्हणाल शहाजीबापूंनी आता राजकारण सोडून क्रिकेटच्या मैदानात काय केलंय. पण, अंदाज बांधण्यापूर्वी ही बातमी वाचाच.

काय झाडी, काय डोंगर... गुवाहाटी राजकारण नव्हे अनपेक्षित घटनेनं पुन्हा चर्चेत
चालू मॅचमध्ये नागोबाचं दर्शन
Image Credit source: social
| Updated on: Oct 02, 2022 | 8:40 PM

नवी दिल्ली : गुवाहाटी गेल्यावर काय झाडी, काय डोंगर, सगळं एकदम ओक्के, हा आमदार शहाजीबापूंचा (Shahajibapu Patil) डायलॉग फेमस झाला आणि गुवाहाटी (Guwahati) चर्चेत आलं. तसंच काहीस पुन्हा एकदा याच गुवाहाटीबाबतीत घडलंय. यंदा मात्र गुवाहाटी राजकीय घडामोडींमुळे नव्हे तर थेट क्रिकेटच्या (Cricket) मैदानात घडलेल्या एका अनपेक्षित घटनेमुळं चर्चेत आली आहे.

हे ट्विट पाहा

गुवाहाटीत भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकली. भारताची फलंदाजी सुरु असताना चालू सामन्यात खेळाडूंना नागोबाचं दर्शन झालंय. यानंतर अचानक सगळेच शॉक झाल्याचं पहायला मिळालं. चालू सामन्यात साप कसा येऊ शकतो, असंही बोललं गेलं.

हा व्हिडीओ पाहा

सामना सुरु असताना आठवे षटक सुरू होण्यापूर्वी एक साप मैदानावर आला आणि त्यामुळे सामना काही काळ थांबला. त्यानंतर मैदानावरील कर्मचाऱ्यांनी या सापाला बाहेर काढले आणि पुन्हा सामना सुरू केला.

राहुलचं अर्धशतक

11व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर राहुलनं अर्धशतक पूर्ण केल्या आहे. मार्करामच्या चेंडूवर षटकार ठोकत राहुलनं अर्धशतक पूर्ण केलंय.

बीसीसीआयचं ट्विट

सामन्यातला तुम्ही हा व्हिडीओ पहाच. तुम्हीही स्तुती करू लागाल.

हा व्हिडीओ पाहा

रोहित बाद

रोहित शर्मा बाद झाला. 10व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर रोहितला महाराजांवर मोठा फटका खेळायचा होता पण चेंडू थेट डीप मिडविकेटवर उभ्या असलेल्या क्षेत्ररक्षकाच्या हातात गेला. रोहितचं अर्धशतक हुकलंय.

बीसीसीआयचं ट्विट

रोहितला दुखापत

रोहित जखमी झाला आहे. त्याच्या हाताला दुखापत झाली आहे. दुसऱ्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर त्याने लॅप शॉट खेळला आणि यादरम्यान चेंडू थेट त्याच्या हातावर आदळला आणि त्याला त्रास होऊ लागला. मात्र, फिजिओनं येऊन त्याला थोडा दिलासा दिला आणि आता तो खेळतोय.

टीम इंडियाचे प्लेइंग-11

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, अर्शदीप सिंग, दीपक चहर, हर्षल पटेल.

दक्षिण आफ्रिकेचे 11 खेळाडू

टेम्बा बावुमा (क), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रिले रुसो, डेव्हिड मिलर, एडन मार्कराम, ट्रिस्टन स्टब्स, वेन पेर्नेल, कागिसो रबाडा, एनरिक नॉर्खिया, लुंगी एनगिडी, केशव महाराज