IND vs SA T 20 Series: भारत-दक्षिण आफ्रिकेत कोणाचं पारडं जड? वसीम जाफर यांनी सांगितला फेवरेट संघ

टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू वसीम जाफर (Wasim jaffer) सोशल मीडियावर नेहमी Active असतात. मीम्स आणि कमेंट्सच्या माध्यमातून ते फॅन्सना नेहमीच एंटरटेन करत असतात.

IND vs SA T 20 Series: भारत-दक्षिण आफ्रिकेत कोणाचं पारडं जड? वसीम जाफर यांनी  सांगितला फेवरेट संघ
Wasim Jaffer
Image Credit source: IPL
| Updated on: Jun 09, 2022 | 3:32 PM

मुंबई: टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू वसीम जाफर (Wasim jaffer) सोशल मीडियावर नेहमी Active असतात. मीम्स आणि कमेंट्सच्या माध्यमातून ते फॅन्सना नेहमीच एंटरटेन करत असतात. आजपासून भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये टी 20 सामन्यांची मालिका सुरु होत आहे. त्या संदर्भात त्यांनी आपलं मत मांडलं आहे. या मालिकेत आपला कुठला फेवरेट संघ आहे, ते त्यांनी सांगितलं. काल सामन्याच्या पूर्वसंध्येला के.एल.राहुल (KL Rahul) दुखापतीमुळे संपूर्ण मालिकेला मुकणार असल्याचं जाहीर करण्यात आलं. कॅप्टन राहुलच या सीरीजमध्ये न खेळणं, हा एक झटका आहे, असं जाफर यांनी म्हटलं आहे. राहुलच्या अनुपस्थितीत ऋषभ पंतला टीम इंडियाचं कॅप्टन बनवण्यात आलं आहे. हार्दिक पंड्याची उपकर्णधारपदी नियुक्ती झाली आहे. BCCI च्या निवड समितीने या मालिकेत IPL 2022 मध्ये दमदार प्रदर्शन करणाऱ्या खेळाडूंना संधी दिली आहे. अनेक सीनियर खेळाडूंना विश्रांती दिली आहे. उमरान मलिक, अर्शदीप सिंह या युवा खेळाडूंना आपला जलवा दाखवण्याची संधी आहे.

केएल राहुलची अनुपस्थिती हा भारतासाठी एक झटका

वसीम जाफर यांनी भारत-दक्षिण आफ्रिका टी 20 सीरीजमध्ये विजयासाठी आफ्रिकेला पसंती दिली आहे. ते फेवरेट असल्याचं जाफर म्हणाले. “तुम्ही दोन्ही संघ पाहिले, तर दक्षिण आफ्रिका पसंतीचा संघ आहे. कारण केएल राहुल खेळत नाहीय. कुलदीप यादव दुखापतीमुळे खेळणार नाहीय. पण त्याला प्लेइंग-11 मध्ये स्थान मिळणार का? या बद्दल माझ्या मनात प्रश्न होता. केएल राहुलची अनुपस्थिती हा भारतासाठी एक झटका आहे” असे जाफर यांनी सांगितलं.

दक्षिण आफ्रिकेचा सर्वोत्तम संघ आलाय

“दक्षिण आफ्रिकेचा सर्वोत्तम संघ आलाय. त्यामुळे ते चांगली सुरुवात करतील. त्यांच्याकडे चांगलं गोलंदाजी आक्रमण आहे. चांगले फिरकी गोलंदाज आहेत”, असं जाफर ईएसपीएन क्रिकइंफोशी बोलताना म्हणाले. दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज डेल स्टेनने भारत-दक्षिण आफ्रिका टी 20 सीरीज रोमांचक होईल, अशी भविष्यवाणी केली आहे. त्याच्यामते भारताकडे भरपूर क्रिकेट खेळलेले खेळाडू आहेत.