AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! आता गॅस सिलिंडरची चिंता मिटली, विधिमंडळात भुजबळांची मोठी घोषणा, राज्य सरकारने अखेर निर्णय घेतला

राज्यात सध्या गॅस सिलिंडरचा मोठा तुटवडा जाणवत आहे, गॅस मिळत नसल्यानं अनेक हॉटेल बंद ठेवण्याची वेळ आली आहे, तसेच घरगुती गॅस सिलिंडरसाठी देखील रांगा लागल्याचं चित्र आहे. या पार्श्वभूमीवर आता मोठी बातमी समोर आली आहे.

मोठी बातमी! आता गॅस सिलिंडरची चिंता मिटली, विधिमंडळात भुजबळांची मोठी घोषणा, राज्य सरकारने अखेर निर्णय घेतला
Chhagan Bhujbal Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 16, 2026 | 3:53 PM
Share

राज्यात सध्या इंधन टंचाई जाणवत आहे, सिलिंडरचा तुटवडा आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी विधीमंडळात महत्त्वाची माहिती दिली आहे.  आजचा हा जो विषय आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. गॅस पुरवठा हा विषय केंद्रशासीत विषय आहे, आणि केंद्राने सांगितलं आहे की, त्यांच्याकडे मुबलक प्रमाणात एलपीजी आणि पीएनजीचा साठा आहे. त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही. त्यामुळे पॅनिक होण्याचं कारण नाही, कुठेही रांगा लावणे आणि गॅसचं ब्लॅक मार्केटिंग करणे हे होता कामा नये. आम्ही प्रत्येक जिल्हाधिकारी, एसपी आणि बाकीचे अधिकारी यांच्या कमिट्या नेमल्या आहेत. या माध्यमातून आम्ही आतापर्यंत 2129 चौकशा केल्या. या कारवायांमधून आतापर्यंत एक हजार दोनशे आठ गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले आहेत. आतापर्यंत 33 लाख 66 हजार 411 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात आम्ही एकूण 23 गुन्हे दाखल केले असून 18 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती यावेळी मंत्री भुजबळ यांनी दिली आहे.

पुढे बोलताना भुजबळ यांनी म्हटलं की, गेल्या महिन्यात गॅस सिलिंडरच्या किंमती या 852.50 रुपये एवढ्या होत्या. आता त्यामध्ये वाढ होऊन त्या 912.50 रुपये एवढ्या झाल्या आहेत. तर व्यावसायिक सिलिंडर 1720.50 रुपयांवरून 1835 रुपयांवर पोहोचले आहे. सकाळीच मी प्रमुख गॅस वितरण कंपन्या, डीपीसीएल, एचपीसीएल, आयओसीएल या ज्या काही प्रमुख कंपन्या आहेत, त्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. त्यांनी मला सांगितलं एलपीजीचं दैनिक उत्पादन जे काही आहे, ते 9 हजार मेट्रिक टनांवरून 11 हजार मेट्रिक टनांपर्यंत वाढवण्यात आलं आहे. काही अडचणी आल्या तर त्या दूर करण्यांचं काम देखील सुरू आहे. केंद्र सरकारकडून कंपन्यांना ऑर्डर आहेत, घरगुती गॅसचा पुरवठा झाल्यानंतर जो काही गॅस उरेल तो गॅस पुरवठ्यासाठी काही संस्थांना प्राधान्य देण्यात आलं आहे, ज्यामध्ये रुग्णालयांना 100 टक्के प्राधान्य देण्यात आलं आहे. शैक्षणिक संस्थांना 100 टक्के प्राधान्य देण्यात आलं आहे. तसेच सार्वजनिक सेवांना देखील 100 टक्के प्राधान्य देण्यात आलं आहे. तसेच रेल्वे, हवाई वाहतूक आणि संरक्षण क्षेत्राशी संबंधित जे उपहार गृह आहेत, त्यांना 70 टक्के प्राधान्य देण्यात आलं आहे, आणि यातून जर गॅस उरला तर औषध उद्योगाला 50 टक्के आणि बीज प्रक्रियेला 50 टक्के गॅसचा पुरवठा करण्यात येणार आहे, असं भुजबळ यांनी म्हटलं आहे.

सरकारची मोठी घोषणा

दरम्यान सध्या राज्यात गॅसचा तुटवडा जाणवत आहे, यावर मार्ग काढताना आता राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. याबाबत देखील यावेळी भुजबळ यांनी माहिती दिली आहे. आपल्याकडे दुसरा पर्याय नाही, पण एक मार्ग आहे तो म्हणजे केरोसीन. आपल्याकडे केरोसीनचा मोठ्या प्रमाणात साठा आहे. काही वर्षांपूर्वी नागपूरच्या हाय कोर्टानं सांगितलं होतं की, जर तुमच्याकडे उज्वला गॅस योजना आहे तर तुम्हाला आता केरोसीनची गरज नाही. त्यामुळे केरोसीन असून देखील आपण देत नव्हतो. पण आता आपण हाय कोर्टाला कळवलं आहे की, सध्या अडचणीची परिस्थिती आहे, त्यामुळे लोकांना आता आम्हाला वापरण्यासाठी केरोसीन देखील उपलब्ध करून द्यावं लागेल. हे केरोसीन आता केरोसीन डीलर्सकडे वितरणासाठी देण्यात येईल. तसेच आयोसीएल, बीपीसीएल, एचपीसीएल कंपन्यांचे जे पंप आहेत, तिथे देखील आपण केरोसीन उपलब्ध करून देण्यार आहोत.

Follow Us
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101 अमेरिकन डॉलरचा..
Mumbai Cha Raja | हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101 अमेरिकन डॉलरचा हार, व्हिडीओ होतोय व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल