AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता युद्ध इराण जिंकणार? टाकले असे 5 डाव ज्याने अमेरिका-इस्रायल हैराण; ट्रम्प यांना जबर हादरा!

Iran vs US : इराण आणि अमेरिकेच्या युद्धाच्या सुरुवातीलाच इराणची एअर डिफेन्स प्रणाली पूर्णपणे कोसळली होती. मात्र आता या युद्धात इराण आघाडी घेताना पहायला मिळत आहे. याची सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

आता युद्ध इराण जिंकणार? टाकले असे 5 डाव ज्याने अमेरिका-इस्रायल हैराण; ट्रम्प यांना जबर हादरा!
Iran LeaderImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Mar 16, 2026 | 4:01 PM
Share

इराण आणि अमेरिकेत भीषण युद्ध सुरू आहे. 28 फेब्रुवारीला युद्ध सुरू झाल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये इराणची एअर डिफेन्स प्रणाली पूर्णपणे कोसळली. त्यानंतर काही वेळातच अमेरिकन आणि इस्रायली वायुसेनेने इराणमधील अनेक लष्करी आणि राजकीय ठिकाणे उद्ध्वस्त केली. पहिल्या काही तासांमध्ये अयातुल्ला अली खामेनेई यांचीही हत्या करण्यात आली. त्यांच्या सोबत 40 बड्या कमांडरचाही खात्मा करण्यात अमेरिकेला यश आले. यामध्ये इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्डचे प्रमुख मोहम्मद पाकपूर आणि सुरक्षा सल्लागार अली शमखानी यांचा समावेश होता. मात्र आता युद्धाच्या 10 दिवसांनंतर परिस्थिती बदलली असून इराण या युद्धात आघाडी घेताना दिसत आहे.

अमेरिका आणि इस्रायलला इराणमध्ये सत्तांतर घडवून आणायचे होते. मात्र यात अमेरिकेला यश आलेले नाही. त्यामुळे आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला कमकुवत करण्यासाठी चीनसह नाटो देशांकडून मदत मागितली आहे. त्यामुळे आता असा प्रश्न उपस्थित होत आहे की, अवघ्या 15 दिवसांत इराणने असे काय केले की अमेरिका सारखी महासत्ता बॅकफूटवर गेली? या उत्तर आपण 5 मुद्द्यांमध्ये जाणून घेऊयात.

युद्ध लांबवण्याची रणनीती

इराणने हे युद्ध जास्त दिवस चालवण्याची रणनीती अवलंबली. यासाठी सैन्यामध्ये शक्तीचे विभाजन करण्यात आले आणि त्याला मोज़ेक फॉर्म्युला असे नाव देण्यात आले. या धोरणानुसार सैन्याच्या प्रत्येक युनिटला स्वतंत्रपणे निर्णय घेण्याचा अधिकार देण्यात आला. याचा परिणाम असा झाला की मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा नष्ट झाल्यानंतरही इराणकडून अमेरिकेच्या मित्र देशांवर हल्ले सुरूच राहिले. इराणने लहान-लहान ड्रोनच्या मदतीने अरब देशांना टार्गेट केले.

आर्थिक नाकेबंदीची योजना

इराणने युद्ध सुरू झाल्यानंतर आर्थिक नाकेबंदीची रणनीती आखली. होर्मुज सामुद्रधुनीच्या परिसरात घेराव घातला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी जहाजांना त्या मार्गाने जाण्यास सांगितल्यानंतर इराणने थायलंडच्या एका मालवाहू जहाजाला रडारवर पकडले. त्यानंतर होर्मुजचा मार्ग पूर्णपणे अडवला. त्यामुळे अमेरिकेसह अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसला.

अमेरिकन हल्ल्यांची वास्तव दाखवले

अमेरिकन हल्ल्यांचे वास्तव जगासमोर आणण्यासाठी इराणने अमेरिकन मीडिया CNN ला तेहरानमध्ये प्रवेश दिला. CNN ने ट्रम्प प्रशासनावर टीका करणाऱ्या अनेक बातम्या दिल्या. त्यामध्ये इराणमधील एका शाळेत झालेल्या हल्ल्याची बातमीही होती. या शाळेवरील हल्ल्यात 160 हून अधिक मुलांचा मृत्यू झाला. यामुळे जगभरातून ट्रम्प सरकार टीका करण्यात आली.

माध्यमांद्वारे जगाला माहिती दिली

इराणचे परराष्ट्र मंत्री अमेरिकन माध्यमांना दररोज मुलाखती देत आहेत. इराणचा प्रयत्न हा संघर्ष इस्रायल विरुद्ध इराण असा दाखवण्याचा आहे. परराष्ट्र मंत्री अब्बास यांनी एका मुलाखतीत म्हटले, जर इस्रायलसाठी अमेरिका आपल्या सैनिकांना मरायला पाठवत असेल, तर आम्ही काय म्हणणार? आम्ही तर फक्त स्वतःचे संरक्षण करत आहोत.’ या प्रकारच्या संदेशांद्वारे इराण आंतरराष्ट्रीय स्तरावर मजबूत भूमिका तयार करत आहे.

अंतर्गत बंडखोरी रोखण्यात यश

अयातुल्ला अली खामेनेई यांच्या हत्येनंतर अमेरिका आणि इस्रायलला अपेक्षा होती की इराणमधील सामान्य नागरिक रस्त्यावर उतरतील आणि सत्ताबदल होईल. मात्र तसे झाले नाही. तसेच इराणमध्ये अस्थिरता निर्माण करण्यासाठी अमेरिकेने कुर्द गटांशी संपर्क साधल्याचीही माहिती समोर आली होती, मात्र इराणने तो प्रयत्नही हाणून पाडला. त्यामुळे या युद्धात इराण आता आघाडी घेताना पहायला मिळत आहे.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल