
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा केवळ 5 धावा करून बाद झाला. कागिसो रबाडाला पूल मारण्याच्या नादात फसला आणि विकेट दिली. ही विकेट कागिसोसाठी मैलाचा दगड ठरली.

कागिसो रबाडाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहित शर्माला सर्वाधिक वेळा बाद करणारा गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम टीम साऊदीच्या नावावर होता. कागिसो रबाडाने आतापर्यंत एकूण 13 वेळा रोहित शर्माला बाद केले आहे.

न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टीम साऊदीने एकूण 12 वेळा रोहित शर्माला बाद करून हा विक्रम नोंदवला होता. आता कागिसो रबाडाने हा विक्रम मोडीत काढत अव्वल स्थान गाठले आहे.

रबाडाच्या भेदक गोलंदाजीने टीम इंडियाचे आघाडीचे फलंदाज रोहित शर्मा (5), श्रेयस अय्यर (31), विराट कोहली (38) लवकर पॅव्हेलियनमध्ये परतले. यानंतर अश्विन (8) आणि शार्दुल ठाकूर (24) यांनी विकेट घेतल्या आणि रबाडाने 5 विकेट्स पूर्ण केल्या.

कागिसो रबाडाने भारताविरुद्ध केवळ 44 धावा देत 5 विकेट घेतले. कागिसोने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 500 बळी पूर्ण केले. ही कामगिरी करणारा तो दक्षिण आफ्रिकेचा सातवा गोलंदाज ठरला आहे.

शॉन पोलॉक (823), डेल स्टेन (697), मखाया एनटिनी (661), एलन डोनाल्ड (602), जॅक कॅलिस (572) आणि मॉर्न मॉर्केल (535) यांनी ही कामगिरी केली होती. आता या यादीत 28 वर्षीय कागिसो रबाडाची भर पडली आहे.