
Rishabh Pant Shoe: विकेटकीपर फलंदाज आणि भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार ऋषभ पंतचं कसोटी संघात पुनरागमन झालं आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात पायाला दुखापत झाल्याने गेल्या तीन महिन्यांपासून क्रिकेटपासून दूर होता. पण दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून पुन्हा एकदा मैदानात उतरला आहे. या सामन्यातील पहिल्या डावात दक्षिण अफ्रिकेने 159 धावांची खेळी केली होती. या धावांचा पाठलाग करताना भारताचा डाव 189 धावांवर आटोपला. फक्त 30 धावांची आघाडी भारताकडे आहे. तर ऋषभ पंतने 2 चौकार आणि 2 षटकार मारत 27 धावांची खेळी करून बाद झाला. पण यावेळी क्रीडाप्रेमींचं लक्ष त्याच्या पायाकडे होते. त्याच्या पायात असलेले दोन्ही बूट वेगवेगळे होते. त्यामुळे चर्चेचा विषय ठरला होता.
कर्णधार शुबमन गिल रिटायर्ड हर्ट झाल्यानंतर ऋषभ पंत मैदानात उतरला होता. तेव्हा त्याच्या पायाकडे कॅमेरा वळला आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण त्याच्या एका बुटाच्या पुढे काळा पॅच होता. तर दुसऱ्या बुटाचा पॅच हा पांढराच होता. पंतने काळ्या रंगाचा पॅच असलेलं बूट दुखापत झालेल्या पायात घातलं होतं. नुकताच त्या पायाला झालेल्या दुखापतीतून सावरला आहे. कदाचित त्या पायाला दुखापत झालेली पाहता त्यासाठी विशिष्ट पद्धतीने बूट डिझाईन केलं असण्याची शक्यता आहे. मून बूट असण्याची शक्यता आहे. या बुटांना वॉकिंग बूट किंवा ऑर्थोपेडिक बूट असंही म्हंटलं जातं. सामान्यतः फ्रॅक्चर, लिगामेंट फाटणे किंवा पाय आणि घोट्याच्या भागात गंभीर जखमा झालेल्या रुग्णांना असे बूट दिले जातात.
ऋषभ पंतने या सामन्यात एक मोठा विक्रम मोडला आहे. 27 धावा केल्या असल्या तरी वीरेंद्र सेहवागचा मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. वीरेंद्र सेहवागच्या नावावर असलेला सर्वाधिक षटकारांचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. वीरेंद्र सेहवागने कसोटीत 90 षटकार मारले होते. कोलकाता कसोटीपूर्वी ऋषभ पंत आणि सेहवागच्या षटकारांची बरोबरी होती. पण पहिला षटकार मारताच त्याने सेहवागचा विक्रम मोडीत काढला. आता त्याच्या नावावर 92 षटकार असून आघाडीवर आहे. यात येत्या काही कसोटी भर पडणार यात काही शंका नाही.