IND vs SA U19: वैभव सूर्यवंशीकडून षटकारांचा वर्षाव, दुसरीकडे सामना थांबवण्याची वेळ

भारत आणि दक्षिण अफ्रिका अंडर 19 संघात वनडे मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यातही विचित्र स्थिती उद्भवली होती. पण हा सामना भारताने जिंकला होता. दुसऱ्या सामन्यातही तसंच काहीसं घडलं. पण सामना सुरु झाला.

IND vs SA U19: वैभव सूर्यवंशीकडून षटकारांचा वर्षाव, दुसरीकडे सामना थांबवण्याची वेळ
IND vs SA U19: वैभव सूर्यवंशीकडून षटकारांचा वर्षाव, दुसरीकडे सामना थांबवण्याची वेळ
Image Credit source: टीव्ही 9 हिंदीवरून
| Updated on: Jan 05, 2026 | 9:16 PM

अंडर 19 वर्ल्डकप 2026 स्पर्धेपूर्वी भारत आणि दक्षिण अफ्रिका संघात मालिका सुरू आहे. या मालिकेत संघाची धुरा वैभव सूर्यवंशीकडे आहे. 14 वर्षीय वैभव सूर्यवंशी व्यवस्थितरित्या संघाचं नेतृत्व करत आहे. त्याच्यावर जबाबदारीचं कोणतंही ओझं दिसत नाही. दुसर्‍या वनडे सामन्यात नाणेफेकीचा कौल हा दक्षिण अफ्रिकेच्या बाजूने लागला. यावेळी त्यांनी फलंदाजीचा निर्णय घेतला. तसेच प्रथम फलंदाजी करताना 49.3 षटकात सर्व गडी गमवून 245 धावा केल्या. तसेच विजयासाठी 246 धावांचं आव्हान दिलं. या धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीला कर्णधार वैभव सूर्यवंशी एरोन जॉर्जसोबत उतरला. पहिल्या सामन्यात वैभव सूर्यवंशी काही खास करू शकला नव्हता. पण दुसऱ्या सामन्यात वैभव सूर्यवंशीने प्रतिस्पर्धी संघाची भंबेरी उडवली. समोर येईल त्या गोलंदाजाला फोडून काढला. वैभव सूर्यवंशीने 10 षटकार आणि 1 चौकार मारत 24 चेंडूत 68 धावांची खेळी केली.

वैभव सूर्यवंशीने अवघ्या 19 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. पण शतकाचं स्वप्न काही पूर्ण करू शकला नाही. वैभव सूर्यवंशी बाद झाला आणि सामनाही फार काळ चालला नाही. टीम इंडियाचा स्कोअर 102 धावांवर असताना विजांचा कडकडाट सुरू झाला. त्यामुळे पंचांना तात्काळ सामना थांबवण्याचा निर्णय घेतला. दोन्ही संघाचे खेळाडू पळतच ड्रेसिंग रूममध्ये पोहोचले. जवळपास 40 मिनिटे हा सामना थांबला. त्यानंतर पुन्हा सामना सुरू झाला. तेव्हा टार्गेट 246 वरून 230 वर आलं आणि सामन्याला सुरुवात झाली. पण 11 चेंडूंचा सामना झाला आणि पुन्हा सामना विजांच्या कडकडाटामुळे थांबवावा लागला. तेव्हा भारताने 2 गडी गमवून 115 धावा केल्या होत्या. त्यानंतर 176 धावांचं करण्यात आलं.

डकवर्थ लुईस नियमानुसार मिळालेलं टार्गेट भारताने 2 गडी गमवून 23.3 षटकात पूर्ण केलं. एरोन जॉर्जने 19 चेंडूत 20 धावा केल्या. तर वेदांत त्रिवेदी 57 चेंडूत 4 चौकार मारत नाबाद 31 धावा केल्या. अभिज्ञान कुंडूने 42 चेंडूत नाबाद 48 धावांची खेळी केली. यावेळी त्याने 3 चौकार आणि 2 षटकार मारले. भारताने तीन सामन्यांची वनडे मालिका 2-0 ने खिशात झाली आहे. तिसरा सामना आता औपचारिक असणार आहे. पहिल्या सामन्यात भारताने 301 धावांचं टार्गेट दिलं होतं. दक्षिण अफ्रिकेने 4 गडी गमवून 148 धावांपर्यंत मजल मारली होती. पण हा सामना रद्द झाला आणि भारताने डकवर्थ लुईस नियमानुसार 25 धावांनी सामना जिंकला. आता तिसरा वनडे सामना 7 जानेवारीला होणार आहे.