T20 World Cup: आधी मैदान मारलं, मग मनं जिंकली, टीम इंडियाकडून स्कॉटलंडच्या खेळाडूंना टिप्स, ड्रेसिंग रुममध्ये गप्पांचा फड

| Updated on: Nov 06, 2021 | 12:05 PM

टीम इंडियाने शुक्रवारी केवळ सामना जिंकला नाही तर विरोधी संघाच्या खेळाडूंची आणि भारतीय क्रिकेटरसिकांची मनंदेखील जिंकली. सामना संपल्यानंतर स्कॉटलंड संघाने टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भारतीय खेळाडूंची भेट घेतली आणि त्यांच्याकडून खेळातील बारकावे जाणून घेतले.

1 / 6
टीम इंडियाने टी-20 विश्वचषकातील (T20 World Cup) पहिले दोन सामने गमावल्यानंतर तिसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानला (India vs Afghanistan) 66 धावांनी मात देत पहिला-वहिला विजय मिळवला. पण त्याहून तगडा विजय शुक्रवारी भारताने स्कॉटंलडला (India vs Scotland) 8 गडी राखून पराभूत करत मिळवला आहे. विशेष म्हणजे भारताने स्कॉटलंडला दिलेलं लक्ष्य केवळ 39 चेंडूत पूर्ण केल्याने गुणतालिकेतही भारत नेटरनेटमध्ये सर्वांच्या पुढे गेला आहे. पण केवळ 2 विजय खात्यात असल्याने तिसऱ्या स्थानावर सध्यातरी भारत आहे. दरम्यान, टीम इंडियाने काल केवळ सामना जिंकला नाही तर विरोधी संघाच्या खेळाडूंची आणि भारतीय क्रिकेटरसिकांची मनंदेखील जिंकली. सामना संपल्यानंतर स्कॉटलंड संघाने टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भारतीय खेळाडूंची भेट घेतली आणि त्यांच्याकडून खेळातील बारकावे जाणून घेतले. यावेळी विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, आर अश्विन आणि के. एल. राहुल या स्टार्सनी स्कॉटलंडच्या खेळाडूंशी चर्चा केली.

2 / 6
स्कॉटलंडविरुद्धच्या सामन्यात केएल राहुलने 18 चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याने भारतासाठी दुसरे सर्वात जलद अर्धशतक झळकावले. सामन्यानंतर अनेक स्कॉटिश खेळाडूंनी केएल राहुलशी मैदानावरच चर्चा केली. नंतर ड्रेसिंग रूममध्येही स्कॉटिश क्रिकेटपटूंनी राहुलशी संवाद साधला.

3 / 6
स्कॉटलंडविरुद्धच्या सामन्यात जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीनेही कमाल केली होती. त्याने 3.4 षटके टाकली आणि एका मेडनसह 10 धावा दिल्या, तसेच त्याने दोन गडी बाद केले. बुमराहने स्कॉटलंडच्या खेळाडूंशीही संवाद साधला. त्याने या खेळाशी संबंधित त्याचा अनुभवही शेअर केला.

4 / 6
हिटमॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने स्कॉटलंडच्या क्रिकेटपटूंशीही संवाद साधला. स्कॉटलंड क्रिकेटच्या सोशल मीडिया अकाऊंटवर भारतीय खेळाडूंशी झालेल्या संवादाची छायाचित्रेही पोस्ट करण्यात आली होती. यामध्ये त्यांनी भारतीय क्रिकेटपटूंना वेळ दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले.

5 / 6
त्याचवेळी बीसीसीआयने दोन्ही संघातील खेळाडूंमधील संभाषणाचा व्हिडिओही पोस्ट केला आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, "स्पिरिट ऑफ क्रिकेट सर्वोत्तम रुपात. स्कॉटलंडने टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये येण्याची इच्छा व्यक्त केली आणि आपल्या मुलांनी त्यांच्याशी छान गप्पा मारल्या. स्कॉटलंडच्या खेळाडूंनीही अश्विनकडून खेळाच्या नव्या युक्त्या शिकून घेतल्या.

6 / 6
टीम इंडियाचा मार्गदर्शक महेंद्रसिंग धोनीही स्कॉटलंडच्या खेळाडूंशी गप्पा मारताना दिसला.