AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SL : दुसऱ्या टी20 सामन्यात संजू सॅमसनला संधी, या खेळाडूऐवजी प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळालं स्थान

भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन सामन्यांची टी20 मालिका सुरु आहे. या मालिकेतील दुसरा सामना असून भारताने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी घेतली. तर श्रीलंकेचा कर्णधार असलंका याने मनासारखं झाल्याचं सांगितलं. भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संजू सॅमसनला स्थान मिळालं आहे.

IND vs SL : दुसऱ्या टी20 सामन्यात संजू सॅमसनला संधी, या खेळाडूऐवजी प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळालं स्थान
| Updated on: Jul 28, 2024 | 7:51 PM
Share

भारत आणि श्रीलंका यांच्यात दुसरा टी20 सामना रंगणार आहे. या सामन्याचा नाणेफेकीचा कौल उशिराने झाला. मैदान ओलं असल्याने नाणेफेकीसाठी दिरंगाई झाली. दरम्यान, सव्वा सात वाजता झालेला नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागला आणि कर्णधार सूर्यकुमार यादव याने गोलंदाजी स्वीकारली. यावेळी संघात एक बदल केल्याचं त्याने सांगितलं. पहिल्या सामन्यात स्थान न मिळालेल्या संजू सॅमसनला दुसऱ्या सामन्यात संधी मिळाली आहे. यासाठी उपकर्णधार शुबमन गिल याला बसवण्यात आलं आहे. संजू सॅमसनला संधी मिळाल्याने त्याचे चाहतेही खूश झाले आहेत. कर्णधार सूर्यकुमार यादवने सांगितलं की, “आम्ही पहिल्यांदा गोलंदाजी करणार आहोत. हवामान पाहता दुसऱ्या डावात फलंदाजी करणं सोपं जाईल. तुम्हाला संघाची कामगिरी सुधारण्याची संधी असते. मग तुम्ही सामना जिंकलात तरी सुधारणा करू शकता. आजच्या सामन्यात गिल खेळणार नाही. त्याच्या मानेला दुखापत झाली आहे. त्याच्याऐवजी संघात संजू सॅमसनला घेतलं आहे.”

कर्णधार चारिथ असलंका याने सांगितलं की, ‘आम्ही प्रथम फलंदाजी करण्यास सक्षम आहोत. आमच्या संघात एक बदल आहे. दिलशान मधुशंका ऐवजी रमेश मेंडिस आला आहे. पहिले तीन फलंदाज खरोखरच चांगले खेळले आणि फक्त चिंतेची बाब म्हणजे गोलंदाजांची आहे. ही एक वापरलेली खेळपट्टी आहे आणि आशा आहे की नंतरच्या भागात फिरकीला मदत होईल.’ भारताने तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिला सामना जिंकला आहे. त्यामुळे भारताकडे 1-0 ने आघाडी आहे. आता दुसऱ्या सामन्यात भारताने विजय मिळवला तर मालिका आपल्या खिशात घालेल. जर श्रीलंका दुसरा सामना जिंकण्यात यशस्वी ठरली तर शेवटच्या सामन्याची रंगत वाढेल.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

श्रीलंका (प्लेइंग इलेव्हन): पाथुम निसांका, कुसल मेंडिस (विकेटकीपर), कुसल परेरा, कामिंदू मेंडिस, चरिथ असलंका (कर्णधार), दासुन शनाका, वानिंदू हसरंगा, रमेश मेंडिस, महेश थेक्षाना, मथीशा पाथिराना, असिथा फर्नांडो.

भारत (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रियान पराग, रिंकू सिंग, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज.

Follow Us
उद्धव ठाकरे दिल्लीला येणार का? CJP संस्थापक अभिजीत दीपकेनं दिलं थेट...
उद्धव ठाकरे दिल्लीला येणार का? CJP संस्थापक अभिजीत दीपकेनं दिलं थेट उत्तर
सुनेत्रा पवार पालकमंत्री... पण मीच पालक! पंकजा मुंडेंच्या विधानाने....
Pankaja Munde | सुनेत्रा पवार पालकमंत्री... पण मीच पालक! पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकारणात नव्या चर्चांना उधाण
अजित पवारांसह अनेकांवर होता आरोप; कोर्टाचा निर्णय येताच...
अजित पवारांसह अनेकांवर होता आरोप; कोर्टाचा निर्णय येताच पवार कुटुंबीयांना मोठा दिलासा, नेमकं प्रकरण काय?
वर्षा बंगल्यावरील बैठकीचं गूढ अखेर उलगडलं! तटकरेंनी एकाच वक्तव्यात....
Sunil Tatkare | वर्षा बंगल्यावरील बैठकीचं गूढ अखेर उलगडलं! तटकरेंनी एकाच वक्तव्यात केला मोठा खुलासा
पंढरपुरात VIP दर्शनावरून वाद! मुनगंटीवार नाराज; गुलाबराव पाटलांना मिळा
Pandharpur | पंढरपुरात VIP दर्शनावरून वाद! मुनगंटीवार नाराज; गुलाबराव पाटलांना मिळाला ग्रीन सिग्नल; नेमकं घडलं काय?
MPSC परिक्षेबाबत महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय! ऑगस्ट 2027 पर्यंत...
Devendra Fadnavis | MPSC परिक्षेबाबत महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय! ऑगस्ट 2027 पर्यंत...
TV9 च्या बातमीनंतर रेल्वेप्रशासन खडबडून जागं झालंय; अखेर शेतातील....
TV9 च्या बातमीनंतर रेल्वेप्रशासन खडबडून जागं झालंय; अखेर शेतातील पाणी काढण्यास सुरुवात
थेट अमित शहांसोबतचा.... आष्टिकरांच्या दिल्लीतील फोटोमुळे खळबळ
Nagesh Ashtikar Photo | थेट अमित शहांसोबतचा.... आष्टिकरांच्या दिल्लीतील फोटोमुळे खळबळ
पहिल्या हायड्रोजन ट्रेनला PM मोदींकडून उद्या हिरवा कंदील
Hydrogen Train | भारतीय रेल्वेची ऐतिहासिक झेप! पहिल्या हायड्रोजन ट्रेनला PM मोदींकडून उद्या हिरवा कंदील
भरधाव कारचा भीषण अपघात! दुभाजकावर धडकून वाहन पलटी; 5 जण जखमी
Bhandara | भरधाव कारचा भीषण अपघात! दुभाजकावर धडकून वाहन पलटी; 5 जण जखमी
शरद पवार तेव्हाच पंतप्रधान झाले असते…केंद्रीय मंत्र्याचं थेट विधान; सगळंच सांगून टाकलं!.

शरद पवार तेव्हाच पंतप्रधान झाले असते…केंद्रीय मंत्र्याचं थेट विधान; सगळंच सांगून टाकलं!

विठ्ठलाला अडचणीत आणू नका; चंद्रकांत दादांचा कृषीमंत्र्यांना खोचक टोला.

विठ्ठलाला अडचणीत आणू नका; चंद्रकांत दादांचा कृषीमंत्र्यांना खोचक टोला

Raghuram Rajan : RBI सारख्या अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेत रघुराम राजन यांना मिळाली महत्वाची जबाबदारी.

Raghuram Rajan : RBI सारख्या अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेत रघुराम राजन यांना मिळाली महत्वाची जबाबदारी

अवघ्या 6 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला मराठी हॉरर कॉमेडी सिनेमा सुपरहिट; कमावला 172.66% नफा.

अवघ्या 6 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला मराठी हॉरर कॉमेडी सिनेमा सुपरहिट; कमावला 172.66% नफा

Sunil Tatkare: जयंत पाटलांसोबत भेट झाली? सुनील तटकरे यांनी अखेर सगळं काही सांगितलं… घडलं काय?.

Sunil Tatkare: जयंत पाटलांसोबत भेट झाली? सुनील तटकरे यांनी अखेर सगळं काही सांगितलं… घडलं काय?

EPFO ने जमा केले 8.25% व्याज, खात्यात पैसा आला की नाही? बॅलेन्स कसे तपासणार?.

EPFO ने जमा केले 8.25% व्याज, खात्यात पैसा आला की नाही? बॅलेन्स कसे तपासणार?