कडकsss! रियान परागचे कठीण खेळपट्टीवर दोन जबरदस्त षटकार, पाहा Video

तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील तिसऱ्या सामन्यात श्रीलंकेने भारतीय फलंदाजांना कोंडीत पकडलं. फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय खेळाडूंचा धावा करताना चांगलाच घाम निघाला. पण भारताने 20 षटकात 9 गडी गमवून 137 धावा केल्या आणि विजयासाठी 138 धावा दिल्या आहेत. रियान परागने आपल्या खेळीने लक्ष वेधून घेतलं.

कडकsss! रियान परागचे कठीण खेळपट्टीवर दोन जबरदस्त षटकार, पाहा Video
| Updated on: Jul 30, 2024 | 10:03 PM

भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात तीन सामन्यांची टी20 मालिका आहे. या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारताला 20 षटकात 9 गडी गमवून 137 धावा करता आल्या. तसेच विजयासाठी 138 धावांचं आव्हान दिलं. त्यामुळे हे आव्हान सोपं वाटत असलं तरी खेळपट्टी तशी नाही. ही खेळपट्टी फिरकीपटूंना मदत करणारी आहे. त्यामुळे भारतीय फलंदाजांची चांगलीच दमछाक झाली. या सामन्यात शुबमन गिलने सावध खेळी करत 37 चेंडूत तीन चौकाराच्या मदतीने 39 धावा केल्या. तसेच रियान परागने 26 आणि वॉशिंग्टनने 25 धावा केल्या. या खेरीज एकही फलंदाज साजेशी कामगिरी करू शकला नाही. यशस्वी जयस्वाल 10, संजू सॅमसन 0, रिंकु सिंह 1, सूर्यकुमार यादव 8, शिवम दुबे 13, मोहम्मद सिराज शू्न्यावर बाद झाला. या सामन्यात खेळपट्टी फलंदाजांना मदत करणारी नाही. असं असताना मधल्या फळीत रियान केलेली फलंदाजी चर्चेत ठरली आहे. क्रीडाप्रेमींनी त्याच्या खेळीचं कौतुक केलं आहे.

रियान परागने 18 चेंडूत 2 षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने 26 धावा केल्या. या खेळीत त्याने वानिंदू हसरंगा याच्यावर जोरदार प्रहार केला. भारताची 13 षटकात 5 गडी बाद 81 अशी स्थिती होती. तेव्हा श्रीलंकेने 14वं षटक हसरंगाकडे सोपवलं. यावेळी रियान पराग वेगळ्याच सुरात दिसला. पहिल्याच चेंडूवर जोरदार प्रहार केला आणि चेंडू सीमेपार पोहोचवला. त्यानंतर दुसरा चेंडू निर्धाव गेला. तिसरा चेंडू बरोबर पट्ट्यात आल्याचं पाहिलं आणि प्रहार करून षटकार मारला.

दुसऱ्या सामन्यात रियान परागने गोलंदाजीत कमाल केली होती. आता फलंदाजीतही चमक दाखवली आहे. त्यामुळे रियान परागची निवड पुढच्या मालिकेत होणार हे आता जवळपास निश्चित झालं आहे. दुसरीकडे, संजू सॅमसन याच्या पदरी मात्र निराशा पडली. सलग दुसऱ्या सामन्यात शून्यावर बाद झाला. त्यामुळे पुढच्या मालिकेतील निवड कठीण आहे. झाली तरी प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवणं कठीण आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

भारत (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रियान पराग, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, खलील अहमद.

श्रीलंका (प्लेइंग इलेव्हन): पाथुम निसांका, कुसल मेंडिस (विकेटकीपर), कुसल परेरा, कामिंदू मेंडिस, चरित असलंका (कर्णधार), चामिंडू विक्रमसिंघे, वानिंदू हसरंगा, रमेश मेंडिस, महेश थीक्षाना, मथीशा पाथिराना, असिथा फर्नांडो.