IND vs SL: अवघ्या 5 सेकंदांच्या नाणेफेकीवर ठरणार गॉल कसोटीचा निकाल! जाणून घ्या कसं काय ते

India vs Sri Lanka 1st Test: भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला कसोटी सामना 15 ऑगस्टपासून आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघांनी जोरदार तयारी केली आहे. असं असताना या सामन्यात नाणेफेक जिंकणं खूपच महत्त्वाचं आहे. त्याचं नेमकं कारण काय ते समजून घ्या.

IND vs SL: अवघ्या 5 सेकंदांच्या नाणेफेकीवर ठरणार गॉल कसोटीचा निकाल! जाणून घ्या कसं काय ते
IND vs SL: अवघ्या 5 सेकंदांच्या नाणेफेकीवर ठरणार गॉल कसोटीचा निकाल! जाणून घ्या कसं काय ते
Image Credit source: BCCI Twitter
| Updated on: Aug 13, 2026 | 3:28 PM

गॉल कसोटी सामन्यासाठी भारत आणि श्रीलंका दोन्ही संघ सज्ज आहे. 15 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या या सामन्यासाठी दोन्ही संघांनी रणनिती आखली आहे. पहिल्या कसोटीत भक्कमपणे सामोरं जाण्यासाठी सर्व उणीवा दूर करण्याच काम सुरू आहे. असं असताना टीम इंडियाचे गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्ने मॉर्केल यांच्या एका विधानाने दोन्ही संघांना विचार करण्यास भाग पाडलं आहे. मॉर्ने मॉर्केल यांनी सांगितलं की, गॉलची खेळपट्टी चांगली आणि दोन दिवस आरामात फलंदाजी करता येईल. पण पुढच्या तीन दिवसात काय होईल? असा प्रश्न आता क्रीडाप्रेमींना पडला आहे. त्यामुळे नाणेफेकीचा हा महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. कारण नाणेफेक जिंकली आणि खेळपट्टीचा अंदाज पाहता योग्य तो निर्णय घेता येईल. त्यामुळे गॉल कसोटीत नाणेफेक महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

गॉलमध्ये नाणेफेक जिंकणं का आहे महत्त्वाचं?

गॉल कसोटी मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेच्या दृष्टीने खूपच महत्त्वाची आहे. विजयी टक्केवारी सुधारण्यासाठी विजय महत्त्वाचा आहे. त्यामुळे गॉल कसोटीत काहीही करून नाणेफेक जिंकणं भाग आहे. कारण या मैदानात मागच्या पाच कसोटी सामन्यांचा अभ्यास केल्यावर लक्षात येतं. या मैदानात चार सामन्यांचा निकाल लागला आहे आणि तीन सामने नाणेफेक जिंकणाऱ्या संघाने जिंकले आहेत. प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला मोठी धावसंख्या उभारण्यास मदत होते. त्यामुळे गोलंदाजी करणारा संघ अडचणीत येऊ शकतो. गॉलची खेळपट्टी तिसऱ्या दिवशी फिरकीसाठी अनुकूल ठरते. त्यामुळे फलंदाजांना फलंदाजी करणं कठीण जातं. त्यामुळे नाणेफेकी जिंकणं महत्त्वाचं आहे.

मागच्या वर्षी ऑस्ट्रेलियाने या मैदानात प्रथम फलंदाजी करताना 654 धावा केल्या होत्या. तसेच हा सामना श्रीलंकेने एक डाव आणि 242 धावांनी गमावला होता. तर 2024 मध्ये श्रीलंकेने न्यूझीलंडविरुद्ध 602 धावा केल्या होत्या. हा सामना न्यूझीलंडने एक डाव आमइ 154 धावांनी गमावला होता. म्हणजेच नाणेफेकीचा कौल खूपच महत्त्वाचा आहे. मागचा अंदाज पाहता या सामन्याचा निकाल फक्त 5 सेकंदात लागू शकतो. म्हणजे भारताने हा नाणेफेक जिंकली तर सामन्यावर पकड मिळवेल. तसेच प्रथम फलंदाजी करून श्रीलंकेवर दबाव वाढवू शकते. पण शुबमन गिलचं नाणेफेकीबाबत रेकॉर्ड खूपच खराब आहे. त्यामुळे आता त्याला नाणेफेकीचा साथ मिळते का नाही? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us