
आशिया कप 2025 स्पर्धेतील दुसर्या सामन्यात ए ग्रुपमधील 2 संघ आमनेसामने आहेत. टीम इंडिया विरुद्ध यूएई अर्थात संयुक्त अरब अमिराती या मोहिमेतील आपल्या पहिल्या सामन्यासाठी सज्ज झाले आहेत. सूर्यकुमार यादव भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. तर मुहम्मद वसीम यूएईचं नेतृत्व करणार आहे. उभयसंघातील या सामन्याला रात्री 8 वाजता दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजून 30 मिनिटांनी टॉस झाला. टीम इंडियाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला आहे. कॅप्टन सूर्याने फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे.
शुबमन गिल याचं अनेक महिन्यांनंतर टी 20i संघात पुनरागमन झालं आहे. शुबमन आशिया कप स्पर्धेत उपकर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार आहे. तसेच प्लेइंग ईलेव्हनमध्ये संजू सॅमसन याचाही समावेश करण्यात आला आहे. संजूने गेल्या अनेक टी 20i मालिकेत ओपनिंग केली आहे. मात्र शुबमनच्या कमबॅकमुळे संजूच्या बॅटिंग पोजिशनमध्ये बदल करण्यात येणार असल्याची चर्चा होती. मात्र कर्णधार सूर्याने टॉसनंतर संजू कितव्या स्थानी खेळणार? याबाबत माहिती दिली नाही. मात्र बॅटिंग ऑर्डर पाहता संजू्च्या जागी शुबमन गिल अभिषेक शर्मा याच्यासह ओपनिंग करणार आहे. त्यामुळे संजू कितव्या स्थानी खेळणार? हे फलंदाजीदरम्यानच स्पष्ट होईल.
कॅप्टन सूर्या आणि टीम मॅनेजमेंटच्या एका निर्णयामुळे क्रिकेट चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. टीम इंडियासाठी टी 20i क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाचा प्लेइंग ईलेव्हनमध्ये समावेश करण्यात आलेला नाही. अर्शदीप सिंह याला संधी देण्यात आलेली नाही. तसेच स्टार फिनीशर रिंकू सिंह यालाही प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी देण्यात आलेली नाही.
भारताच्या बाजूने नाणेफेकीचा कौल
🚨 Toss Update 🚨
Captain Surya Kumar Yadav has won the toss & #TeamIndia have elected to bowl against the UAE.
Follow The Match ▶️ https://t.co/Bmq1j2LGnG#AsiaCup2025 | #INDvUAE | @surya_14kumar pic.twitter.com/mbbzEmvSn8
— BCCI (@BCCI) September 10, 2025
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : अभिषेक शर्मा, शुबमन गिल (उपकर्णधार), सूर्यकुमार यादव(कर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि वरुण चक्रवर्ती.
यूएई प्लेइंग ईलेव्हन : मुहम्मद वसीम (कर्णधार), अलिशान शराफू, मुहम्मद जोहैब, राहुल चोप्रा (विकेटकीपर), आसिफ खान, हर्षित कौशिक, हैदर अली, ध्रुव पराशर, मुहम्मद रोहिद खान, जुनैद सिद्दिकी आणि सिमरनजीत सिंग.